बीड : सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. शनिवारी रात्री साडेदहानंतर दोन तास पाऊस झाला. यामध्ये काही तालुक्यांत मोठे नुकसान झाले, तर केज तालुक्यातील धनेगाव येथे विद्युत तारा अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला.जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला. शनिवारी रात्री उशिरा झालेल्या पावसाची एकूण सरासरी २१.०० मि.मी. एवढी नोंद झाली आहे. तालुकानिहाय झालेला पाऊस असा- बीड १७.५, पाटोदा २६.०, आष्टी ३३.४, गेवराई १९.६, शिरूर ३५.०, वडवणी २९.५, अंबाजोगाई १०.६, माजलगाव १६.०७, केज २१.१, धारूर १२.०, तर परळी १०.० मि.मी. पावसाची नोंद दैनंदिन पर्जन्य अहवालात झाली आहे.जूनच्या सुरूवातीलाच पावसाने दिलासा दिला आहे. त्यामुळे शेतकरी दुष्काळाचे नैराश्य झटकून मशागतीच्या कामाला लागला आहे. रविवारी खत, बी-बियाणांच्या दुकानांवर शेतकऱ्यांची रेलचेल पाहावयास मिळाली. जनावरांचा बाजारही फुलला आहे. (प्रतिनिधी)
पावसाने दिलासा
By admin | Published: June 05, 2016 11:57 PM