शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

वर्षाव : निवेदनांचा अन्् दगडांचाही

By admin | Published: October 05, 2016 1:12 AM

औरंगाबाद : आठ वर्षांनंतर शहरात मंगळवारी पहिल्यांदाच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीच्या निमित्ताने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातील संस्था,

औरंगाबाद : आठ वर्षांनंतर शहरात मंगळवारी पहिल्यांदाच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीच्या निमित्ताने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातील संस्था, संघटना आणि व्यक्तींनी मोर्चे व निवेदनांच्या माध्यमातून मायबाप सरकारपुढे आपल्या मागण्या मांडल्या. दुपारपर्यंत सर्व काही शांततेत सुरू होते. रिमझिम पावसात सुभेदारीत मंत्रिमंडळावर निवेदनांचा ‘वर्षाव’ सुरू होता. त्याचवेळी शेवटच्या क्षणी बाहेर अचानक कायम विनाअनुदानित शिक्षकांच्या मोर्चाला हिंसक वळण लागले. आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी शिक्षकांवर लाठीहल्ला केला. यामुळे संतापलेल्या शिक्षकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली अन् निवेदनांबरोबरच दगडांच्या वर्षावात औरंगाबादेतील मंत्रिमंडळाची बैठक आटोपली....शहरात आठ वर्षांनंतर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर मंगळवारी मोर्चे आणि निवेदनांचा अक्षरश: पाऊस पडला. शिक्षक, विद्यार्थी, शेतकरी यांच्यासह विविध संघटनांचे तब्बल २१ मोर्चे मंत्रिमंडळाच्या बैठकीवर येऊन धडकले. याशिवाय मराठवाड्यातील विविध भागातून आलेले सुमारे अडीचशे शिष्टमंडळांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन मंत्र्यांना सादर केले. निवेदन देण्यासाठी सुभेदारी विश्रामगृहावर झुंबड उडालीहोती. राज्य सरकारच्या वतीने महिला व बाल विकासमंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी निवेदने स्वीकारली. मोर्चांना बैठक स्थळापासून दूर आमखास मैदान येथे रोखण्यात आले होते. तेथून पुढे केवळ शिष्टमंडळांनाच प्रवेश देण्यात येत होता. सुभेदारी विश्रामगृहावर निवेदन स्वीकारण्याचे काम सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होते.अतिवृष्टीग्रस्तांना मोठा दिलासा देणार४दहा हजार कोटींच्या सिंचन योजना मंजूर होणार४औरंगाबाद स्मार्ट सिटीसाठी एक हजार कोटी रु. मिळणार४डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील लोकनेते गोपीनाथ मुंडे ग्रामविकास संस्थेला अर्थसहाय्य मिळणार४औरंगाबादच्या कॅन्सर हॉस्पिटलला राज्यस्तरीय संस्थेचा दर्जा मिळणार४डीएमआयसीत नवे उद्योग येणार४औरंगाबादला जलसंधारण आयुक्तालय स्थापन होणारलोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या खुल्या पत्रातील अनेक मुद्यांची मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेतलेली दिसते. या पत्राची आज चर्चा होती. जिल्हा निर्मिती व विभागीय आयुक्तालयासारखे स्फोटक विषय बाजूला ठेवणार४मराठवाड्यात व्यापक वृक्षलागवडीसाठी इको बटालियनची स्थापना करणार४औरंगाबाद शहर हे युनेस्कोकडून जागतिक वारसा जाहीर व्हावे यासाठी आवश्यक कारवाईचा प्रस्ताव मंजूर करणार४जालना येथे सीड पार्क उभारणार४औरंगाबादेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारणार४मराठवाडा वाटर ग्रीड योजना जाहीर करणार४रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना आर्थिक तरतूद करणारस.सो. खंडाळकर ल्ल औरंगाबादबहुचर्चित राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज औरंगाबादेत झाली. तब्बल नऊ वर्षांनंतर अशी बैठक झाल्याने या बैठकीतील निर्णयांकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागून राहिलेले होते. लोकमतने मात्र अशी बैठक व्हावी इथपासून बैठकीत कोणते कोणते निर्णय घेतले जातील, याची गेली काही दिवस परिश्रमपूर्वक मांडणी करून चर्चा घडवून आणली होती.