वैजापूर : तालुक्यात या आठवड्यात पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. गुरुवारी (दि. २३) सायंकाळी शहरासह परिसरात सुमारे दोन तास विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या दोन तासांत तालुक्यात सरासरी ३१.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली असून, शहरालगतचे नारंगी धरण ६४.०१ टक्के भरले आहे.
जोरदार पावसामुळे तालुक्यातील बोर-दहेगाव, कोल्ही, खंडाळा, बिलवणी, जरूळ व मन्याड हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. अतिपावसाने तालुक्यातील लासूरगाव परिसरातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी सायंकाळी शहरातील स्टेशन रोडवरील एका वाहनाच्या शोरूमवर व रोहित्रावर वीज कोसळल्याने मोठे नुकसान झाले. तालुक्यात आतापर्यंत ११२ टक्के पाऊस पडला आहे. गुरुवारी मंडळनिहाय झालेला सरासरी पाऊस व आतापर्यंत झालेला एकूण पाऊस पुढीलप्रमाणे :
मंडळाचे नाव झालेला पाऊस एकूण
वैजापूर ६४ मि.मी. ५९४ मि.मी.
लाडगाव ३५ मि.मी. ४७५ मि.मी.
नागमठाण १५ मि.मी. ३०० मि.मी.
महालगाव २४ मि.मी. ४७८ मि.मी.
लासूरगाव ४१ मि.मी. ८५३ मि.मी.
लोणी ५ मि.मी. ६०५ मि.मी.
शिऊर ६० मि.मी. ७३४ मि.मी.
गारज ४ मि.मी. ७०४ मि.मी.
बोरसर ४२ मि.मी. ७०३ मि.मी.
खंडाळा २६ मि.मी. ६३८ मि.मी.
.......................................................................
एकूण ३१६ मि.मी. ६१६.४ मि.मी.