औरंगाबाद : शहरात रविवारी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाच्या रिमझिम सरी बरसल्या. उन्हाच्या उकाड्यात पावसाच्या हलक्या सरीही सुखावह वाटल्या. रविवारी दिवसभर ऊन तापलेले होते. सायंकाळी पूर्वेकडून दाटून आलेल्या ढगांमुळे जोरदार पाऊस होईल, असा अंदाज होता. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सोसाट्याचे वारे सुरू झाल्यामुळे दुचाकी चालकांची धांदल उडाली. ७ वाजेच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी शहरात बरसल्या आणि थोडा ओलावा सर्वत्र झाला. पावसामुळे किरकोळ घटना घडल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून मिळाली. तर चिकलठाणा वेधशाळा सूत्रांनी सांगितले की, सरी बरसल्या; परंतु त्याची म्हणावी तशी नोंद झाली नाही.