खुलताबाद : पावसाळ्यात तुम्ही जर कुटुंबीयांसोबत दुचाकीवरून म्हैसमाळला जात असाल तर ते धोकादायक ठरणार आहे. अर्धवट बांधकाम असलेल्या या रस्त्यावर सततच्या पावसाने चिखल झाल्यामुळे वाहने घसरू लागल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
खुलताबाद-म्हैसमाळ रस्त्याचे काम अर्धवट आहे. घाटात तसेच गिरीजा मंदिर ते टीव्ही सेंटर रोडवर मोठ्या प्रमाणात पावसाने चिखल झाल्यामुळे वाहने घसरत आहेत. तसेच चाकांमध्ये चिखल फसून चाके जाम होत आहेत. दुचाकीचालकांचा तर या रस्त्यावरून जाताना थरकाप होत असून अनेक जण चिखलात पडत आहेत. पावसाळ्यात म्हैसमाळला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत आहे. मात्र, खराब रस्त्यामुळे येथे जाणारे जाम वैतागत असून इतरांना न जाण्याचा सल्ला देत आहेत. शासन व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
फोटो कॅप्टन : म्हैसमाळ गिरीजा मंदिर ते टीव्ही सेंटर रोडवर तयार झालेली घसरगुंडी.
230721\23_2_abd_62_23072021_1.jpg
म्हैसमाळ गिरिजामंदीर ते टिव्ही सेंटर रोडवर तयार झालेली घसरगुंडी.