शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रकरणी राज ठाकरे यांच्या विरूद्धचे दोषारोपपत्र औरंगाबाद खंडपीठाने केले रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 4:56 PM

२००८ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने  परप्रांतीयांना राज्यातून हाकलण्याबाबत आंदोलन सुरु केले होते.

औरंगाबाद : परप्रांतीयांना राज्यातून हाकलण्याबाबत चिथावणीखोर भाषण देऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज श्रीकांत ठाकरे यांच्या विरुद्ध दाखल दोषारोपपत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्या. के. एल. वडणे यांनी आज  रद्द केले. 

२००८ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने  परप्रांतीयांना राज्यातून हाकलण्याबाबत आंदोलन सुरु केले होते. या पार्श्वभूमीवर २१ ऑक्टोबर २००८ रोजी औरंगाबाद- राजूर बस औरंगाबादकडे परत येत असताना बदनापूर येथे १० ते १५ लोकांनी 'राज ठाकरे झिंदाबाद ' अशा घोषणा देत बसवर दगडफेक केली तसेच 'राज ठाकरे यांचा विजय असो, परप्रांतीयांना' राज्यातून हाकला असा आदेश राज ठाकरे यांनी दिला असल्याचे घोषणा दिल्या. या विरुद्ध बस चालक अंबादास तेलंगरे यांनी त्याच दिवशी बदनापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून राज ठाकरे यांच्यासह १०- ते १५ अनोळखी व्यक्तींविरोधात भादवी कलम ३३६, १४३, १०९ , ११४ तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान विषयक कायद्याचे कलम ३ आणि 4 तसेच मुंबई पोलीस कायद्याचे कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी ३० जानेवारी २०९ रोजी या गुन्ह्याचे दोषारोपपत्र बदनापूरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केले. खटल्याच्या सुनावणीस गैरहजर राहिल्यामुळे राज ठाकरेसह इतर आरोपीविरुद्ध अजामीनपात्र वारंट ( नॉन बेलेबल ) जारी केले. राज ठाकरे यांच्यावतीने अॅड. सागर सोमनाथ लड्डा यांनी ठाकरे यांना दोषमुक्त करण्याबाबत अर्ज दिला मात्र ते प्रत्यक्ष हजर होत नाहीत तोपर्यंत अर्जावर सुनावणी घेण्यास न्यायालयाने तोंडी नकार दिला. 

त्याविरुद्ध ठाकरे यांनी त्यांच्या विरूद्धचे दोषारोपपत्र रद्द करण्याची विनंती करणारी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती. सुरुवातीस २००९ साली खंडपीठाने दोषारोप पत्रास अंतरिम स्थगिती दिली होती. आज याचीकेवर अंतिम सुनावणी झाली असता अॅड. लड्डा यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, २१/१०/२००८ रोजी बदनापूर येथील कथित घटनेच्या दिवशी राज ठाकरे यांना मुंबईतील खेरवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांचा बदनापूर मधील घटनेत सहभाग नाही. अनोळखी व्यक्ती कोण होत्या त्यांच्याशी राज ठाकरे यांचा संबंध नाही. तसेच चिथावणीखोर भाषण दिल्याचा कुठलाही सबळ पुरावा अभियोग पक्ष नायालयात सादर करू शकला नाही ही बाब खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली. सुनावणीअंती खंडपीठानेवरील आदेश दिला. या प्रकणात अॅड. सागर लड्डा यांना अॅड. सत्यजित रहाटे, अंकित साबू , सन्नी खिंवसरा आणि गुलशन मुंदडा यांनी सहकार्य केले.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी