शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्र भोसले यांच्या जलमंदिर पॅलेसमध्ये राजकीय भेटीगाठी
2
45 देशांच्या क्षेत्रफळाहूनही अधिक...,15 वर्षांत झाली डबल...; वक्फ बोर्डाकडे किती संपत्ती? जाणून डोकं चक्रावंल
3
पहिला मान गुजरातला! ३ हजार वंदे मेट्रो सुरू होणार; ‘या’ मार्गावरील सेवेचे तिकीट फक्त ३०₹
4
मराठा आरक्षणावर CM शिंदे,जरांगे पाटील ताेडगा काढतील; OBC आरक्षणाला धक्का लागणार नाही - बावनकुळे
5
केजरीवाल 177 दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर, समर्थकांकडून जोरदार स्वागत; म्हणाले- यांचे कारागृहदेखील...
6
"आयुष्य खटाखट नाही..."; जयशंकर यांचा राहुल गांधींवर निशाणा, स्पष्टच बोलले
7
म्हाडाच्या २ हजार ३० घरांची लॉटरी ८ ऑक्टोबरला, अशी आहे उत्पन्न गटानुसार घरांची संख्या 
8
"मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना एकनाथ शिंदेंच्या संकल्पनेतून"; मंत्री उदय सामंतांनी थेटच सांगितलं
9
शेख हसीना देशात परत जाणार? बांगलादेशात व्हायरल 'कॉल'ची चर्चा; नेमकं प्रकरण काय?
10
“आरक्षणविरोधी राहुल गांधी अन् काँग्रेसचा खरा चेहरा उघड, जनताच आता उत्तर देईल”; भाजपाची टीका
11
आरक्षण बंद करणार असे राहुल गांधी बोललेच नाहीत तर भाजपाचे आंदोलन कशासाठी? काँग्रेसचा सवाल
12
“देवेंद्र फडणवीसांनी मुलीची शपथ घेत मला राज्यपालपदाचा...”; एकनाथ खडसेंच्या दाव्याने खळबळ
13
“१३ महिन्यांच्या वाजपेयी सरकारची लवकरच पुनरावृत्ती, मोदींची खुर्ची डळमळीत”:पृथ्वीराज चव्हाण
14
“राहुल गांधींचे काम देश जोडणारे, भाजपाला लोकसभेत जनतेने उत्तर दिले, आता...”: रमेश चेन्नीथला
15
शत्रूचं ड्रोन अन् फायटर जेटच्याही हवेतच उडणार चिंधाड्या, भारतानं तयार केलं 'अप्रतिम' क्षेपणास्त्र!
16
"आनंदाचा शिधाच्या नावाखाली आनंदाचा मलिदा हे सरकार खातंय"; काँग्रेसचा महायुतीवर मोठा आरोप
17
“फडणवीसांनी माझ्या विरोधात आमदार उभे केले, आता सुट्टी नाही; हिशोब घ्यायचा”: मनोज जरांगे
18
बाप्पाची सेवा करणारी 'ही' अभिनेत्री कोण? शाहरूख, सलमानसोबत हिट सिनेमांमध्ये केलंय काम
19
Port Blair renamed: अंदमान-निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं; आता 'या' नावाने ओळखलं जाणार!

राजस्थानातील दाल-बाटी, चुरमा थाळी झाली मराठमोळी, श्रावणात भंडाऱ्यात भाविकांना मेजवानी

By प्रशांत तेलवाडकर | Published: August 26, 2023 8:29 PM

श्रावण आला... भंडाऱ्यात दाल, बाटी, चुरमा अन् गावरान तुपाची धारेची मेजवानी

छत्रपती संभाजीनगर : श्रावणात येणारे कृष्ण जन्माष्टमी असो वा दहीहंडी, यानंतरचे गणेशोत्सव किंवा नवरात्रोत्सव असो सर्वत्र भंडाऱ्याचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते. यात स्वादिष्ट दाल-बाटी, चुरमा अन् त्यावर गावरान तुपाची धार’ असा पोट तृप्त करून टाकणारा भंडारा दिला जातो.

भंडाऱ्याचे वेधमंदिर, मंगल कार्यालय, सामाजिक हॉल, गोगाबाबा टेकडी, हनुमान टेकडी, साई टेकडी किंवा अन्य निसर्गरम्य वातावरण जिथे भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. तिथे ‘दाल, बाटी, चुरमा’ हमखास असतो. यामुळे सर्वांना भंडाऱ्याचे वेध लागले आहेत.

गोविंदा पथक दाल-बाटी खाऊनच करतात श्रमपरिहारश्रीकृष्ण जन्माष्टमी व नंतर दहीहंडीसाठी शहरातील गोविंदा पथक महिनाभर आधीच प्रॅक्टिस करीत असतात. दहहंडी जिंको किंवा हारो, पण नंतर श्रमपरिहारासाठी भंडारा केला जातो. यात ‘दाल-बाटी’चाच बेत असतो. एका भंडाऱ्यात हजारो लोक जेवतात. यासाठी वर्षभर गोविंदा वाट पाहत असतात.- रोशन पिपाडा, जय भद्रा गोविंदा पथक

दर महिन्याला दहा हजार थालीशहरातील काही हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये वर्षभर ‘दाल-बाटी’ मिळत असते. काही हॉटेलमध्ये गुरुवारी किंवा रविवार असा आठवड्यातील एक दिवस फक्त ‘दाल-बाटी’साठीच राखीव असतो. साधारणत: २०० ते ३५० रुपये दरम्यान दाल-बाटीची थाली मिळते. अनेकजण पार्सलही घेऊन जातात. दाल-बाटीसाठी शहरातील काही हॉटेल प्रसिद्ध आहेत. शहरात दर महिन्याला ८ हजार ते १० हजार दाल-बाटीच्या थालीचा खप असल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले.

दाल-बाटीत पाच प्रकारशहरात पाच प्रकारची दाल-बाटी बनविली जाते. एक गोवऱ्यावर भाजलेली बाटी, मसाला दाल-बाटी, इंदोरी दाल-बाटी, साधी तेलातील दाल-बाटी, जोधपुरी दाल-बाटी. छत्रपती संभाजीनगरात गोवऱ्यावर भाजलेली बाटी किंवा तळलेली दाल-बाटी जास्त पसंत केले जाते. डाळीत पाच डाळींचा वापर केला जातो.- अजय मुथा, केटरर्स

राजस्थानातील दाल-बाटी बनली मराठमोळी१) दाल-बाटी हे राजस्थानमधील पारंपरिक खाद्यपदार्थ आहे.२) बाटीचा इतिहास १३०० वर्षांपूर्वीचा आहे.३) सैनिक युद्धाला जाण्यापूर्वी वाळवंटात पीठाचे गोळे करून वाळू ठेवत.४) दिवसभर उन्हात व वाळूत तापून भाजून त्याची बाटी तयार होत.५) युद्धावरून सायंकाळी मुक्कामस्थळी पोहोचल्यावर हीच बाटी सैनिक खात असत.६) राजस्थानातील दाल-बाटी आता मराठमोळी बनली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShravan Specialश्रावण स्पेशलfoodअन्न