औरंगाबाद : महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपदी भाजपच्या जयश्री कुलकर्णी यांची वर्णी लावण्यात आली आहे. या पदासाठी प्रबळ दावेदार असलेले राजू शिंदे यांचा पत्ता ऐनवेळी कट करण्यात आला. सोमवारी बीड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांना लवकरच मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचा शब्द दिला. महापालिकेची आर्थिक नाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या पदावर पहिल्यांदाच एका महिलेची वर्णी लागणार आहे.महापालिकेत शिवसेना-भाजप युतीने २०१५ मध्ये विविध पदांची आपापसात वाटणी करून घेतली. शेवटच्या वर्षातील स्थायी समिती सभापतीपद भाजपला देण्यात आले. सभापतीपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच शिवसेनेने दोन उमेदवारी अर्ज घेऊन भाजपच्या तंबूत खळबळ उडवून दिली. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सभापतीपदासाठी राजू शिंदे यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आदेश दिला. शिंदे यांनी पक्षाच्या आदेशानुसार शुक्रवारी अर्जही भरला. त्यापाठोपाठ नगरसेविका जयश्री कुलकर्णी यांनीही अर्ज भरला. कुलकर्णी याच पक्षाच्या अधिकृत उमेदवार असल्याचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी जाहीर केले. त्यामुळे या महत्त्वाच्या पदावर कोणाची वर्णी लागणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. सोमवारी बीड येथे दिवंगतनेतेगोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या पुण्यातिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमास पक्षाचे सर्वच वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी स्वत: मुख्यमंत्र्यांनी कुलकर्णी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. राजू शिंदे यांच्यावर लवकरच मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचा शब्दही यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रदेशाध्यक्ष दानवे, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना दिला. मंगळवारी सकाळी राजू शिंदे आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. त्यामुळे कुलकर्णी या महापालिकेच्या इतिहासात पहिल्याच महिला सभापती ठरणार आहेत.
राजू शिंदे यांचा पत्ता कट; कुलकर्णी यांची वर्णी निश्चित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 12:27 AM
महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपदी भाजपच्या जयश्री कुलकर्णी यांची वर्णी लावण्यात आली आहे. या पदासाठी प्रबळ दावेदार असलेले राजू शिंदे यांचा पत्ता ऐनवेळी कट करण्यात आला. सोमवारी बीड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांना लवकरच मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचा शब्द दिला. महापालिकेची आर्थिक नाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या पदावर पहिल्यांदाच एका महिलेची वर्णी लागणार आहे.
ठळक मुद्देस्थायी समिती सभापती : निवडणुकीत आता औपचारिकता शिल्लक