शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ मराठवाडा विदर्भात ठिकठिकाणी रॅली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 5:45 AM

भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग : मोदी सरकारच्या धोरणांना पाठिंबा

औरंगाबाद /नागपूर : राष्ट्रीय नागरिकत्त्व कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ बुधवारी औरंगाबादसह विदर्भातील तीन जिल्ह्यात विविध संघटनांच्यावतीने रॅली काढून पाठिंबा व्यक्त करण्यात आला. औरंगाबादमध्ये राष्टÑीय सुरक्षा मंचच्या वतीने सकाळी हातात तिरंगा ध्वज व घोषवाक्यांचे फलक घेऊन रॅली काढण्यात आली. क्रांतीचौकातून या रॅलीस प्रारंभ झाला. औरंगपुरा येथील महात्मा फुले दाम्पत्याच्या पुतळ्यावजळ रॅलीचे सभेत रूपांतर झाले. यावेळी मोदी-मोदी, अशी घोषवाक्ये असलेले फलक लावण्यात आले व ‘जब तक सूरज-चांद रहेगा, मोदी तेरा नाम रहेगा’ अशा घोषणाही देण्यात आल्या.

व्यापारी, उद्योजक, वकील, डॉक्टर, व मोठ्या प्रमाणावर महिलांनी या रॅलीत सहभाग घेतला. ‘एक भारतीय म्हणून माझा सीएएला पाठिंबा आहे. सीएए के सम्मान में, हम मैदान में, तिरंगे के सम्मान में, राष्टÑभक्त मैदान में,’ अशा वाक्यांचे फलक प्रत्येकाच्याच हातात होते. रॅली औरंगपुऱ्यात आल्यानंतर फुले दाम्पत्याच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तेथेच व्यासपीठावर महाराष्टÑ विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे भाषण झाले. या कायद्याला विरोध करणारे संघ परिवाराविरुद्ध षड्यंत्र रचत आहेत. ३० खासदारांच्या समितीत काँग्रेस, तृणमूल व शिवसेनेचेही खासदार होते. अडीच वर्षांपर्यंत यावर मंथन चालू होते. मग त्यावेळी या खासदारांनी का विरोध केला नाही? असा सवाल बागडे यांनी केला.आ. अतुल सावे, भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, मधुकर जाधव, पुरुषोत्तम हेडा, माजी खा. जयसिंगराव गायकवाड, डॉ. दिवाकर कुलकर्णी, माजी उपमहापौर विजय औताडे आदी रॅलीत सहभागी झाले होते.अब हम खुश है...पाकिस्तानातून औरंगाबादेत येऊन अनेक वर्षे राहत असलेल्या काही बांधवांचा यावेळी सत्कार करण्यात आला. आशिष नावंदर यांनी सीएए कायद्याची माहिती दिली, तसेच या कायद्याविषयी माहिती देणारी पत्रके वाटण्यात आली. ‘आमचा पाकिस्तानात खूप छळ झाला. मंदिर, दुकाने जाळून टाकण्यात आली. धर्मपरिवर्तन करा नाही तर भारतात जा, असे सांगण्यात येत होते. सीएए कायदा केल्याने आम्ही फार खूश आहोत. आता आम्ही भारताचे नागरिक होणार, असे मनोगत त्यांनी मांडले.गोंदियात राष्टÑभक्त समाजाची रॅलीगोंदिया येथे सर्व राष्टÑभक्त समाजतर्फे या कायदाच्या समर्थनार्थ शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत नागरिक मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. देशाच्या सन्मानाला कुठलाही धक्का बसू देणार नाही, शिवाय यासाठी कुठलाही समझोता करणार नाही, भारत देश म्हणजे धर्मशाळा नाही. देशात घुसखोरी करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवा असा सूर या रॅलीतून उमटला.विदर्भात ठिकठिकाणी रॅलीच्नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ बुधवारी विदर्भातील यवतमाळ, गोंदिया, भंडारा व वर्धा जिल्ह्यात ठिकठिकाणी भव्य रॅली काढण्यात आल्या. यवतमाळ येथे राष्ट्रीय विचार मंचसह विविध संघटनांनी पुढाकार घेत बुधवारी येथे मोर्चा काढला.च्या मोर्चाचे नेतृत्व भाजपचे माजी केंद्रीय मंत्रीहंसराज अहीर व जिल्ह्यातील भाजपच्या पाच आमदारांनी केले. शहरातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा मार्गक्रमण करीत गेला. यावेळी कायदा देशहिताचा असल्याच्या घोषणा दिल्या.च्यावेळी भाजप आमदार मदन येरावार, आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके, आमदार डॉ. संदीप धुर्वे, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार नामदेव ससाने, माजी आमदार दिवाकर पांडे, विजयाताई धोटे, प्रवक्ते अमोल पुसदकर, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भूतडा, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, प्रा. प्रवीण प्रजापती आदी उपस्थित होते.च्वर्धेत भारतीय जनता पार्टीसह विविध हिंदूत्ववादी संघटनांच्यावतीने रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये खासदार रामदास तडस यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाºयांसह विविध हिंदुत्वावादी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

टॅग्स :nagpurनागपूरAurangabadऔरंगाबादcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक