वाळूज महानगर : जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामस्वराज्य उद्योजक महिला बचत गट महासंघाच्यावतीने शुक्रवारी प्रदर्शन व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी गंगापूर पंचायत समितीच्या सभापती ज्योती गायकवाड तर उद्घाटक म्हणून जि.प.अध्यक्षा अॅड.देवयाणी डोणगावकर व प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर मिरकले, सरपंच पपीन माने, अविनाश गायकवाड आदींची उपस्थिती होती.अॅड.डोणगावकर म्हणाल्या की, महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी छोटे-छोटे उद्योग सुरु करण्याची गरज आहे. महिलांनी विविध क्षेत्रात चांगले कार्य करुन आपण पुरुषापेक्षा कमी नसल्याचे सिध्द करुन दाखविले असल्याचे सांगत विविध उदाहरणे दिली. सभापती गायकवाड यांनी स्त्री-पुरुष समानतेसाठी लढा देण्याची गरज असून, शासनातर्फे महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली.
कार्यक्रमात महिला बचत गटातर्फे खाद्य पदार्थ, गारमेंटस, गृहपयोगी साहित्य आदीचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. कार्यक्रमात दोन मुलींवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करणाऱ्या मनिषा पठारे, रेखा खरात, पुष्पा उगले, रहिमाबी शेख तसेच मुलींना दत्तक घेणाऱ्या सायरा शेख, मरीनाबी शेख, शारदा घायवट व विविध क्षेत्रात उल्लखनीय कार्य करणाºया महिलांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.