शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

रामचंद्रनगर-साई काॅलनीत चिखलातून शोधावी लागते वाट; पावसाळ्यातही टँकर,जारचे येते पाणी

By साहेबराव हिवराळे | Published: June 20, 2024 7:28 PM

एक दिवस एक वसाहत: शाळा सुरू झाल्या आहेत, पण रस्त्याचे असे हाल असल्याने विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनचालकांना तारेवरची कसरत करीत मुलांना नेताना काळजी घ्यावी लागत आहे.

छत्रपती संभाजीनगर : मयूर पार्कमध्ये वडाच्या झाडापासून ते रामचंद्रनगर चौक, साई कॉलनी या मुख्य रस्त्याला दोन महिन्यांपासून अर्धवट खोदून तसेच पडू दिल्याने रहिवाशांना चिखलातून वाट शोधावी लागते. या भागात पाणीटंचाईमुळे पावसाळ्यातसुद्धा टँकर अन् जारच्या पाण्यावर तहान भागवावी लागते आहे.

शाळा सुरू झाल्या आहेत, पण रस्त्याचे असे हाल असल्याने विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनचालकांना तारेवरची कसरत करीत मुलांना नेताना काळजी घ्यावी लागत आहे. पालकांनाही सातत्याने ही चिंता भेडसावत आहे. आता मोठा पाऊस पडल्यास परिसराला बेटाचे स्वरूप येण्याची भीती रहिवाशांना वाटत आहे. सरपटणारे प्राणी घराच्या जवळ बऱ्याचदा आढळतात. त्यामुळे नागरिकांना घाबरूनच राहावे लागत आहे. ड्रेनेजलाईनही मनपाने टाकली नसून स्वखर्चाने रहिवाशांनीच पैसे गोळा करून टाकली आहे. अशा एक नव्हे तर अनेक प्रश्नांची सोडवणूक करायला मनपा अधिकारी व कुणीही पुढे येण्यास तयार नाही.

दोन दिवस अंधारातवीज बिल पूर्ण अदा करूनही दोन दोन दिवस वीजपुरवठा खंडित असतो. फ्यूज कॉल सेंटर व अधिकाऱ्यांना कळवूनही प्रश्न सुटत नाही, अशी साई कॉलनीची दशा आहे.- रामदास बलांडे, रहिवासी

घंटागाड्या येत नाहीतपरिसरात घंटागाडीच येत नाही. त्यामुळे नागरिकांना कचरा अनेक दिवस घरात साठवून आजारांना आमंत्रण द्यावे लागत आहे.- विजयमाला भालेराव, रहिवासी

किती दिवस त्रास?नागरिकांनी जागा विकत घेतली अन् घरे बांधली. औषध फवारणी करायला कुणीही येत नाही. आम्ही शहरात आहोत की खेड्यात; हेच कळत नाही.- मदन सानप, रहिवासी

सुविधा का नाही?मूलभूत सुविधा देण्याकडे कानाडोळा का केला जातो? पावसाळ्यात परिसरातील अवस्था अत्यंत वाईट होणार असून, नातेवाईक पावसाळ्यात चुकूनही फिरकत नाहीत.- विजय वाढेकर, रहिवासी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका