लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास परभणीतील सावली विश्रामगृह येथे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून समाजकल्याण विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने अधिकाºयांना सूचना दिल्या.रामदास आठवले हे शनिवारी हिंगोली दौºयावर होते. नियोजित कार्यक्रमानुसार हिंगोलीचा दौरा पूर्ण करुन ते परभणीतून देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे जाणार असल्याने शनिवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास त्यांचे परभणीतील सावली शासकीय विश्रामगृहात आगमन झाले. त्यानंतर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांनी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.यावेळी काही कार्यकर्त्यांनी समाजकल्याण विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांच्याकडे केली. त्यावरुन आठवले यांनी अधिकाºयांना या संदर्भात सूचना देऊन सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करण्याचे अधिकाºयांना आदेश दिले. यावेळी अॅड.गौतम भालेराव, डी.एन. दाभाडे, विजय गायकवाड, तहसीलदार विद्याचरण कडवकर, समाजकल्याण अधिकारी तेजस माळवदकर, माधव हातागळे, राणूबाई वायवळ, मनोहर सावंत, भगवान कांबळे, लक्ष्मण बनसोडे, नवनाथ मुजमुले, निवृत्ती हत्तीअंबिरे आदींसह रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या पदाधिकाºयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांशी साधला संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:24 AM