वाळूज महानगर : पाणीपुरवठा कर्मचाºयाला झालेल्या मारहाणीच्या निषधार्थ सोमवारी रांजणगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन केले. यावेळी मारहाणीच्या घटनेचा निषेध करुन कर्मचाºयांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.
रांजणगावला एमआयडीसीकडून कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असून, जलस्त्रोताची पाणीपातळीही कमी झाली आहे. त्यामुळे गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतीच्या आदेशानुसार पाणीपुरवठा कर्मचाºयाकडून नळाला लावलेल्या मोटारी जप्त केल्या जात आहेत. या मोहिमेंतर्गत योगेश सिरसाठ याने शनिवारी मातोश्री नगर येथील कल्पना ठाकूर यांची नळाला लावलेली पाण्याची मोटार जप्त केली होती. ठाकूर यांनी सिरसाठ याला मारहाण केली होती.
या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी पाणीपुरवठा व स्वच्छता कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन केले. यावेळी कर्मचाºयांनी संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान या मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायतीने जवळपास आठशे ते नऊशे पाण्याच्या मोटारी जप्त केल्या आहेत. याप्रसंगी योगेश सिरसाठ, गणेश गायके, अनिल वाकळे, अर्जुन गवळी, संतोष जयस्वाल, अर्जुन जाधव, सचिन काकडे, अब्दुल शेख, कय्युम शेख, नवनाथ शिंदे, बाळू कुºहाडे, अरुण माळी, राजेंद्र गाडे, संदीप गायकवाड, जालिंदर शिंदे, दत्ता सुतार, देविदास जाधव, अरुण घुसळे, गणेश काळवणे आदींची उपस्थिती होती.