वैजापूर तालुक्यातील बाभूळगाव गंगा, शनि देवगाव, बाजाठाण, वांजरगाव, डोणगाव, लाख, बाबतारा, पुरणगाव, डागपिंपळगाव, चांदेगाव, नागमठाण, बाजाठाण, आवलगाव, चेंडूफळ या गावांमध्ये वाळूमाफिया सक्रिय असून, सर्रास वाळू उपसा करीत आहेत. शनि देवगाव, बाजाठाण, हमरापूर, आवलगावपर्यंत अवैध वाळू उपसा होत असल्याने, याबाबत अनेक नागरिकांनी तक्रारी करूनही काहीच उपयोग झाला नाही. आवलगावच्या बाजूने ट्रॅक्टरने तर खानापूरकडून ट्रॅक्टर चे टायर बैलगाडीला जोडून वाळू उपसा केला जात आहे. गोदावरी पात्रातील वाळूला मोठी मागणी चढ्या भावाने विक्री होत असल्याने वाळू माफियांचे चांगभले होत आहे.
गोदावरी नदीच्या श्रीरामपूर हद्दीत काही गावांत वाळूचा लिलाव झाला आहे. त्याचा फायदा या भागातील वाळू तस्कर घेत आहेत. त्यामुळे शासनाचे मात्र नुकसान होत आहे. त्यामुळे महसूल व पोलीस यंत्रणेने या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
कोट
रात्री-अपरात्री होत असलेल्या वाळू वाहतुकीमुळे नागरिकांना त्रास होत आहे, तसेच परिसरातील रस्ते या जड वाहतुकीमुळे पूर्णपणे उखडले आहेत. या तस्करांवर प्रशासनाने कारवाई करावी.
-ज्योती ढेंबरे, सरपंच, सावखेडा गंगा
फोटो : गोदावरी नदी पात्रातून होत असलेली वाळूचाेरी.
230421\img_20210302_134612_1.jpg
गोदावरी नदी पात्रातून होत असलेली वाळू चाेरी.