गंगापूर: गंगापूरात मराठा आंदोलकांनी दुसऱ्या दिवशी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले वैजापूर मार्गावर वरखेड पाटी येथे आंदोलकांनी मंगळवारी (३१) रोजी सकाळी ११ वाजता टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, सोमवारी आमदार बंब यांचे कार्यालय फोडणाऱ्या आंदोलकांवर गंगापूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
वरखेड पाटी परिसरातील मराठा आंदोलकांनी वैजापूर मार्गावर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करून आरक्षणाची मागणी केली. तसेच पाईप आडवे टाकून, टायर जाळून रासतारोको केला. गंगापूर तहसीलदार सतीश सोनी यांनी यानंतर आंदोलकांचे समजूत घालून निवेदन स्वीकारले. यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी संजयपुर येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी व ग्रामस्थांनी पाच किलोमीटर रॅली काढून जोरदार घोषणाबाजी करत आरक्षणाची मागणी केली.तहसीलदार सतीश सोनी यांनी विद्यार्थ्यांचे निवेदन स्वीकारले दरम्यान गंगापूर खुलताबाद मतदार संघाचे भाजप आमदार प्रशांत बंब यांचे कार्यालय फोडणाऱ्या पाच आंदोलकांवर गंगापूर पोलिसांनी सोमवारी रात्री विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला यामध्ये विनोद काळे,भाऊसाहेब शेळके,लक्ष्मण सांगळे,दादासाहेब जगताप, सुभाष कानडे,संकेत मैराळ यांच्यासह इतर १५ अज्ञात मराठा आंदोलकांवर गुन्हा करण्यात आला आहे.