लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील महसूल विभागातील काही अधिकारी व कर्मचारी वरिष्ठ अधिकाºयांना अंधारात ठेवून परस्पर रजेवर जाण्याचे प्रमाण वाढले असून या बेशिस्तीबद्दल जिल्हाधिकारी पी.शिव शंकर यांनी संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.जिल्ह्यातील महसूल विभागात गेल्या काही महिन्यांपासून बेशिस्तीचे प्रमाण वाढले आहे. वरिष्ठ अधिकाºयांची परवानगी न घेताच किंवा रजा मंजूर करुन न घेताच रजेवर जाणाºयांचे प्रमाण वाढले आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी नुकताच सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व अन्य प्रमुख अधिकाºयांच्या नावे आदेश काढला आहे. त्यामध्ये वर्ग १, २, ३ व ४ संवर्गातील अधिकारी- कर्मचारी हे रजेवर गेल्यानंतर रजा पाठवून देतात किंबहुना रजा शाखेतच ठेवतात व रजा मंजूर न करता परस्पर निघून जातात. ही बाब निश्चित कार्यालयीन शिस्तीचा भंग करणारी आहे. अधिकारी- कर्मचारी हे वैद्यकीय कारणास्तव अनुपस्थित असल्यास त्याबाबतचा अहवाल त्याच दिवशी संंबंधित कार्यालयप्रमुखांनी देणे अपेक्षित असताना त्यांच्याकडून अहवाल दिला जात नाही. परिणामी कामकाजावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे उपजिल्हाधिकारी व तहसीलदार संवर्गातील अधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांची पूर्व परवानगी व रजा मंजूर करुन घेऊनच रजा उपभोगावी.तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले अव्वल कारकून, लिपीक आणि शिपाई यांनी रजेवर जाण्यापूर्वी रितसर अर्ज करुन रजा निवासी उपजिल्हाधिकाºयांकडून मंजूर करुन घेणे आवश्यक आहे. यापुढे जे अधिकारी- कर्मचारी रजा मंजूर न करता परस्पर रजा पाठवून गैरहजर राहतील, अशा अधिकारी- कर्मचाºयांची रजा नामंजूर करुन सदर अनुपस्थित कालावधी विना वेतन करण्यात येईल व संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र सेवा नागरी सेवा अधिनियमाप्रमाणे निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाºयांनी दिला आहे.
अधिकारी-कर्मचाºयांच्या परस्पर रजेचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:40 AM