शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
2
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
3
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
4
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
5
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
6
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
7
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
8
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
9
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
10
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
11
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
12
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
13
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
14
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
15
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
16
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
17
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
18
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
19
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
20
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट

किराणा दुकानांपेक्षा रेशनची डाळ महाग

By admin | Published: August 26, 2016 12:13 AM

बीड : यावर्षीपासून स्वस्त धान्य दुकानांवर गोरगरिबांसाठी डाळ देऊ केली आहे; मात्र किराणा दुकानांपेक्षा आठ रुपये जादा दाराने रेशन कार्डधारकांना डाळ विकत घ्यावी लागणार आहे.

बीड : यावर्षीपासून स्वस्त धान्य दुकानांवर गोरगरिबांसाठी डाळ देऊ केली आहे; मात्र किराणा दुकानांपेक्षा आठ रुपये जादा दाराने रेशन कार्डधारकांना डाळ विकत घ्यावी लागणार आहे. यामुळे रेशन दुकानदार गोदामातून माल उचलताना डाळ नको, असे म्हणत आहेत; परंतु जिल्हा पुरवठा विभागाने रेशन दुकानदारांना इतर धान्यांबरोबर डाळ घेणे अनिवार्य केले आहे.सध्या सणासुदीचे दिवस आहेत. गोरगरिबांचे सण गोड व्हावेत या उद्देशाने शासन स्वस्त धान्य दुकानांमार्फत धान्य पुरवठा करते. मात्र, यावेळी शासनाने दिलेली डाळ किराणा दुकानापेक्षा जास्त भावाने गोरगरिबांना घ्यावी लागत आहे. या प्रकारामुळे स्वस्त धान्य दुकानांच्या उद्देशाला शासनाने हरताळ फासला असल्याने तक्रार तरी करायची कुणाकडे, असा प्रश्न जिल्ह्यातील हजारो रेशन कार्डधारकांनी उपस्थित केला आहे.जिल्ह्यात दोन हजारांवर स्वस्त धान्य दुकाने असून, सद्यस्थितीत सहा हजार क्विंटल डाळ आली आहे. स्वस्त धान्य दुकानदार डाळ स्वीकारण्यास नकार देत असल्याने अधिकाऱ्यांनाच पंचायत पडली आहे. यावर तोडगा म्हणून प्रत्येक दुकानदाराला गहू, साखर, तांदूळ याबरोबरच डाळ घेणे अनिवार्य केले आहे. स्वस्त धान्य महाग झाल्याने ऐन सणासुदीत गोरगरीबांच्या खिशाला कात्री बसणार आहे. यामुळे गोरगरीब नागरिक चिंतेत आहेत. (प्रतिनिधी)