शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

लोंबकाळणाऱ्या विजवाहिन्यांनी घेतला राशन दुकानदाराचा बळी; दोघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 8:41 PM

विजवाहिन्यांतून करंट टेम्पोत उतरल्याने झाली दुर्घटना

औरंगाबाद : लोंबकाळणाऱ्या वीज वाहिनीचे करंट लागून तीन जण होरपळले या घटनेत राशन दुकानदाराचा अंत झाला तर अन्य दोघे खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत . ही घटना गुरुवारी दुपारी हर्सुल परीसरातील एकतानगर येथे घडली . राहुल न्यानेश्वर गायके (वय ३४, रा . शिवछत्रपतीनगर , हडको एन १२ ) असे मयताचे नाव आहे .

 याविषयी पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांनी सांगितले की , राहुल गायके यांचे हर्सुल येथील एकतानगर येथे स्वस्त धान्य दुकान आहे . आज दुपारी त्यांनी ग्राहकांना वाटप करण्यासाठी टेंपोमधून धान्य आणले होते . दुकानात माल उतरविल्यानंतर टेंपोचालक तेथून जाउ लागला . मात्र गल्लीत टेंपो बंद पडला  .   टेंपोची बॅटरी नादुरुस्त  असल्यामुळे चालकाने राहुल आणि दुकानाजवळ बसलेल्या अन्य एकाला  टेंपोला मागून धक्का देण्यास सांगितले . यामुळे राहुल आणि अन्य एक जण टेंपोला धक्का देत असताना रस्त्यावरील महावितरणच्या लोंबकाळणाऱ्या वीज वाहिनीला टेंपोच्या लोखंडी टपाचा स्पर्श झाला . यामुळे स्पार्किंग होऊन टेंपोत वीज प्रवाह उतरल्याने राहुलसह दोघांना जोराचा शॉक लागला .नुकताच पाउस झालेला होता आणि राहुल यांनी पायात चप्पल  बुट घातलेला नव्हता यामुळे ते घटनास्थळीच बेशुद्ध झाले  .  

टेंपो चालक आणि अन्य एकजणालाही जबर शॉक  लागल्याने त्यांना तात्काळ एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले . अधिक उपचारासाठी राहुल यांना घाटीत दाखल केले असता तेथील डॉक्टरानी त्यांना तपासून मयत घोषित केले . या घटनेची माहिती मिळताच हर्सुल ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले ,पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग भागिले ,  सहायक उपनिरीक्षक  सय्यद बाबर आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी तर सहायक पोलीस निरीक्षक नितीन कामे यांनी घाटी रुग्णालयात धाव घेतली . याविषयी हर्सुल ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली . 

महावितरणकडे अनेकदा तक्रारीएकतानगरचे माजी नगरसेवक रूपचंद वाघमारे म्हणाले की , एकतानगरमध्ये महावितरणने टाकलेल्या कोटेड वीजवाहिनी अनेक ठिकाणी जोड देण्यात आले आहे . यामुळे परीसरातील वीज  पुरवठा सतत खंडीत होत असल्यामुळे महावितरणच्या  अधिकाऱ्याकडे वीज वाहिनी बदलण्यात यावी याकरीता अनेकदा पाठपुरावा केला . मात्र याची दखल न घेतल्यामुळे आजची घटना घडली . या घटनेमुळे परिसरातील नागरीकांनी तीव्र संताप व्यक्त केला .

टॅग्स :electricityवीजAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू