पैठण : रविवारी सायंकाळी धरणातील जलसाठा १०० टक्क्यांकडे आगेकूच करीत असताना धरणात येणारी आवक १७ हजार क्युसेकपर्यंत वाढल्याने धरणाचे १६ दरवाचे सहा इंचाने वर उचलून गोदावरी पात्रात ९९७३ क्युसेक विसर्ग करण्यात आला. धरणात येणारी आवक वाढली तर त्या प्रमाणात धरणातून होणारा विसर्ग वाढविण्यात येईल, असे उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान पाणी सोडताना धरणाचा जलसाठा ९८ टक्के राखला जाईल, असे धोरण जायकवाडी प्रशासनाने कायम केले असल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले. जलक्षमता१५२२ फूट असलेल्या जायकवाडी धरणाचीपाणीपातळी ही १५२१.९३ झाल्याने धरणातून तातडीने पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. अधीक्षक अभियंता म्हेत्रे, उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण, अभियंता संदीप राठोड, बुद्धभूषण दाभाडे, रमेश चक्रे आदींच्या पथकाने धरणाचे दरवाजा क्रमांक १०, २७, १६, २१, १४, २३, १२, २५, ११, २६, १३, २४, १५, २२, १७, २० अर्धाफूटवर उचलून गोदावरी पात्रात ८३८४ क्यूसेक व जलविद्युतकेंद्रामधून १५८९ क्यूसेक इतका असा एकुण ९९७३ क्यूसेक इतका विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरु आहे.
महिनाभरापूर्वी उघडले होते दरवाजे जायकवाडी धरणाची पाणीपातळी १५२१.९३ झाली असून, धरणात एकूण जलसाठा २९००.६८३ दलघमी झाला आहे. यापैकी २१६२.५७७ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. यंदा धरणातून १५ आॅगस्ट रोजी दरवाजे उचलून प्रथम पाणी सोडण्यात आले होते. यानंतर रविवारी १५ सप्टेंबर रोजी धरणाचे दरवाजे उचलून परत पाणी सोडण्यात आले आहे.
गोदाकाठच्या नागरिकांना इशाराजायकवाडी धरणातून कोणत्याही क्षणी विसर्ग वाढवावा लागणार असल्याने तहसीलदार महेश सावंत यांनी यंत्रणेमार्फ त गोदाकाठच्या नागरिकांना सतर्क तेचा इशारा देण्यात आला आहे.