जनाबाई जाधव लिखित 'चोळी' आणि 'ओंजळी' या दोन कविता संग्रहांचा प्रकाशन सोहळा दि. २० फेब्रुवारी रोजी एमजीएम संस्थेच्या रूक्मिणी सभागृहात आयोजित करण्यात आला होता. कवी प्रा. दवणे यांच्या हस्ते कविता संग्रहांचे प्रकाशन झाले. डॉ. बालाजी जाधव, पत्रकार नितीन सांवत, बाळ कांदळकर, प्रशांत डिंगणकर, जनाबाई जाधव, देवराव कमानदार यांची यावेळी व्यासपीठावर विशेष उपस्थिती होती.
मन हलके करण्याचा मार्ग जनाबाई यांनी त्यांच्या कवितांमधून शोधला आहे, असेही दवणे यांनी यावेळी सांगितले.
डॉ. बालाजी जाधव प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल डिंगणकर यांनी ॲड. सुदर्शना जगदाळे यांचे कौतूक केले. प्रविणा कन्नडकर यांनी संचालन केले. तर विनोद जाधव यांनी आभार मानले. केले. विनोद जगदाळे, दीपक जाधव, प्रकाश जाधव यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
फोटो ओळ :
'चोळी' आणि 'ओंजळी' या दोन कविता संग्रहांचे प्रकाशन करताना कवी प्रा. प्रविण दवणे यांच्यासह नितीन सावंत, बाळ कांदळकर, डॉ. बालाजी जाधव, देवराव कमानदार, जनाबाई जाधव, कवी प्रशांत डिंगणकर.