शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
2
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
3
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
4
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
5
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
6
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
7
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
8
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
9
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
11
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
12
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
13
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
14
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
15
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
16
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
17
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
18
वांद्रे रेल्वे स्थानकालगतची ४५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त; प्रशासनाची धडक कारवाई 
19
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...

ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये वाढत आहे वाचनाची संस्कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 1:31 PM

अब्दुल कलाम यांची पुस्तके सर्वात जास्त वाचली जात आहेत. मुले साहसी पुस्तके, चरित्रे मोठ्या प्रमाणात वाचतात.

साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची वाचनसंस्कृती वाढावी म्हणून वर्षभरात ५० पुस्तके वाचणाऱ्या विद्यार्थ्यांना अभिनंदनपत्र पाठविण्याचा उपक्रम केला. महाराष्ट्रातील ५५० विद्यार्थ्यांनी त्यांना वाचलेल्या ५० पुस्तकांची यादी पाठविली. या सर्व विद्यार्थ्यांना देशमुख यांनी पत्र पाठविले व त्यातील निवडक विद्यार्थ्यांचा मराठी दिनानिमित्त सत्कार केला. या उपक्रमाविषयी लक्ष्मीकांत देशमुख यांची हेरंब कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. 

प्रश्न : मुलांमधील वाचनसंस्कृती वाढावी म्हणून सतत बोलले जाते; पण तुम्ही याबाबत ठोस उपक्रम केला. हा का करावा वाटला ? उत्तर : साहित्य संमेलन अध्यक्ष झाल्यावर नव्या पिढीत वाचनसंस्कृती वाढावी यासाठी मी शासन स्तरावर अनेक प्रयत्न केले व करतो आहे; पण प्रत्यक्ष मुलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी काही करावे, असे वाटले. त्यामुळे वाचणाऱ्या मुलांना आपण पत्र लिहून कौतुक करावे यासाठी एका वर्षात ५० पुस्तके जी मुले वाचतील त्यांनी त्या पुस्तकांची यादी पाठवावी, असे आवाहन केले.

प्रश्न : प्रतिसाद कसा मिळाला? उत्तर : प्रतिसादाने मी थक्क झालो. राज्यातील १८ जिल्ह्यांतील ५५० विद्यार्थ्यांनी मला वाचलेल्या पुस्तकांची यादी शाळेमार्फत पाठवली. त्यात विशेष म्हणजे ग्रामीण भागातील सर्वाधिक पत्रे आली आहेत. ४० टक्के पत्रे जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची आहेत. मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांतून पत्रे आली आहेत. एकूण पत्रांत मुलींची पत्रे ७० टक्के आहेत. शहरी पत्रे कमी आहेत. ग्रामीण भागातील हे वाढते वाचनप्रेम हे खूप आश्वासक आहे. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या २५ मुला-मुलींनीही याद्या पाठवल्या आहेत. 

प्रश्न : मुले साधारणपणे काय वाचतात, असे तुमचे निरीक्षण आहे?उत्तर : मी उत्सुकतेने त्या याद्या बघितल्या. अब्दुल कलाम यांची पुस्तके सर्वात जास्त वाचली जात आहेत. त्यानंतर सुधा मूर्ती यांची पुस्तके, साने गुरुजींची पुस्तके व फास्टर फेणे, अशी साहसी पुस्तके, चरित्रे मुले मोठ्या प्रमाणात वाचतात, असे दिसून आले. त्यांना त्या छोट्या गावात जी पुस्तके मिळतात तेच ती वाचणार हाही मुद्दा आहे. यापुढचा टप्पा म्हणून आम्ही मुलांना वाचलेल्या पुस्तकांचा परिचय लिहून पाठवा, असे आवाहन करीत आहोत व मुलांना पत्र पाठविण्याचा उपक्रम मी आता दरवर्षी राबविणार आहे. 

मुलांनी पुस्तके वाचावीत म्हणूनपरिपाठ झाल्यावर रोज एका पुस्तकाची माहिती सांगावी, असे आवाहन मी शाळांना करतो आहे. यातून किमान २०० पुस्तके मुलांना माहीत होतील. मी राज्यातील सर्व विद्यापीठ कुलगुरूंना पत्रे लिहिली व प्रत्येक महाविद्यालयात वाङ्मय मंडळ स्थापन करावे, असे आवाहन केले. त्याला प्रतिसाद मिळतो आहे. 

एक शासन निर्णय हवा...शिक्षण विभागाने एक शासन निर्णय याबाबत प्रसिद्ध करावा यासाठीचा एक मसुदा मी शिक्षणमंत्र्यांना दिला आहे. त्यात मी परिपाठात रोज एका पुस्तकाची माहिती देणे, तालुका स्तरावर मुलांचे साहित्य संमेलन आयोजित करणे, प्रत्येक शाळेने दरवर्षी विद्यार्थी लेखनाचे पुस्तक किंवा हस्तलिखित प्रसिद्ध करणे व वाढदिवसाला मुले व शिक्षकांनी शाळेला पुस्तक भेट देणे, असे मुद्दे या प्रस्तावित शासन निर्णयात आहेत. प्रत्येक तालुक्यात पुस्तकांचे दुकान असले पाहिजे यासाठी शासकीय इमारतीत दुकान बांधून दिले पाहिजे. जिल्हा नियोजन समितीच्या बजेटमध्ये हे शक्य आहे. पूर्णवेळ ग्रंथपाल आणि शाळांना पुस्तक खरेदीसाठी अनुदान देणे या गोष्टी शासनाने करायला हव्यात.

टॅग्स :literatureसाहित्यAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थी