शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

'कर घ्या; पण रस्ते, पाणी द्या'; सातारा आणि देवळाईतील वसाहती खड्डे अन् चिखलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 5:34 PM

रस्ते चिखलमय झाले असून, पायी चालणेही अवघड झाले आहे.

ठळक मुद्देमनपाकडून सुविधा बेदखल  नागरिकांत संतापाची लाट

- साहेबराव हिवराळे 

औरंगाबाद : महापालिकेने दुर्लक्ष केलेल्या सातारा, देवळाईतील विविध वसाहतींमधील रस्त्यांवर खड्डे आणि चिखल झाला असून, नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.  

मनपात समाविष्ट झालेल्या परिसरात कोणताच निधी उपलब्ध झालेला नाही, जुन्याच निधीतून पाच रस्त्यांची कामे चालू आहेत. काही दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे सातारा, देवळाई परिसरातील कच्चे रस्ते चिखलमय झाले असून, पायी चालणेही अवघड झाले आहे. चिखल तुडवतच नागरिकांना चालावे लागत आहे. देवळाईच्या नाईकनगर, माऊलीनगर, राजनगर, तसेच अरुणोदय कॉलनी, दिशा घरकुल, म्हाडा परिसराचा रस्ता, छत्रपतीनगर, आलोकनगर, पृथ्वीनगर, आयप्पा मंदिर रोड, लक्ष्मी कॉलनी, पेशवानगर, आमदार रोड, संग्रामनगर, ठाकरेनगर, हायकोर्ट कॉलनी, एकतानगर, सातारा गाव, पटेलनगर, शाहनगर, सुधाकरनगर यासह विविध रस्त्यांवरून जाताना कुठेही शहर असल्याचे जाणवत नाही. मनपात असूनही ग्रामीण भागातील शेतवस्तीवर चिखलमय पाऊलवाटा असल्याचे जाणवत आहे. नागरिकांना घरापर्यंत सुरक्षित जाता यावे, असे रस्ते मनपाने द्यावेत, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य जावेद पटेल, हरिभाऊ राठोड, पंकजा माने, रणजित ढेपे, सलमान पटेल, रमेश पवार आदींंनी केली आहे.

कर घ्या; पण रस्ते, पाणी द्या   सातारा, देवळाईत ज्या पद्धतीने कर लावून वसुलीचा बडगा राबविला जात आहे, त्याला नागरिकांचा विरोध नाही. कर घ्या; परंतु रस्ते, पाणी या महत्त्वाच्या मूलभूत समस्यांचे निराकरण करण्यावर भर देण्याची गरज आहे. जुलैअखेरीस ३ कोटी ७० लाखांचा कर मनपाच्या तिजोरीत जमा झाला आहे. जायकवाडीतील पाणीसाठा ६० टक्क्यांच्या वर गेला असल्याने शहराप्रमाणेच सातारा, देवळाईकरांची तहान भागवावी, अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल नरवडे, सोमीनाथ शिराणे, जमील पटेल, शेख झिया, गणेश साबळे, जिजा काळे, पोपटराव सोळनर आदींनी केली आहे.   

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकरWaterपाणी