शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

‘लालपरी’सोबतच खरी दिवाळी; कर्तव्यावरील चालक-वाहकांचे आगारातच अभ्यंगस्नान, फराळ

By संतोष हिरेमठ | Published: November 13, 2023 3:05 PM

आगारात अभ्यंगस्नान, फराळाचे वाटप; कुटुंबीयांसोबतच दिवाळी साजरी करण्याची अनुभूती

छत्रपती संभाजीनगर : सुगंधी साबण, उटणे आणि गरम पाण्याने अभ्यंगस्नान... त्यानंतर खमंग फराळाचा आस्वाद... अगदी घरीच कुटुंबीयांसोबतच दिवाळी साजरी करीत असल्याची अनुभूती रविवारी प्रवाशांसाठी कर्तव्यावर असलेल्या ‘एसटी’च्या चालक- वाहकांना आली.

एसटी महामंडळातर्फे रविवारी पहाटे मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानकात दिवाळी साजरी करण्यात आली. पहाटे एसटी चालक- वाहकांना अभ्यंगस्नान घालण्यात आले. त्यांना उटणे, सुगंधी तेल, साबण, आंघोळीला गरम पाणी देण्यात आले. फराळाचे वाटप करण्यात आले. एसटी महामंडळ प्रशासनाने केलेल्या या आदरातिथ्यामुळे कर्मचाऱ्यांना सुखद धक्का मिळाला.

सिडको बसस्थानकात पहाटे ५:३० वाजता विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांच्या हस्ते मुक्कामी असलेल्या चालक- वाहकांना फराळाचे वाटप करण्यात आले. विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी अंबादास घोडके, कामगार अधिकारी विनायक आंबट, आगार व्यवस्थापक संतोष घाणे यांच्यासह अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

‘लालपरी’सोबतच खरी दिवाळीदिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने जादा बससेवा देण्याचे नियोजन केले. एसटीचा चालक, वाहक आणि अन्य कर्मचाऱ्यांची दिवाळी चार चाकांवर धावणाऱ्या एसटी आणि त्यातील प्रवाशांच्या सेवेत निघून जाते. मात्र, प्रवासी सेवेत आणि ‘लालपरी’सोबतच दिवाळीचा खरा आनंद असल्याचे चालक- वाहकांनी म्हटले.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2023Aurangabadऔरंगाबाद