शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
2
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
4
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
5
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
6
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
7
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
8
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
9
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
10
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
11
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
12
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
13
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
14
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
15
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
17
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
18
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
19
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
20
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या

मराठवाड्यातील बंडखोरी; १८ विधानसभा मतदारसंघात ठरणार अपक्षांच्या मतांवर विजयाचे गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2024 12:17 PM

महायुती, महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयाचे गणित बिघडणार

छत्रपती संभाजीनगर : प्रमुख पक्षांकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेले अनेक जण अपक्ष म्हणून निवडणूक मैदानात उतरले आहेत. मराठवाड्यातील ४६ पैकी तब्बल १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये हेच अपक्ष उमेदवार महाविकास आघाडी आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवारांचे गणित बिघडवू शकतात.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांचा अपक्षांमुळे घाम निघणार आहे. त्यामध्ये वैजापूर विधानसभेत भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, कन्नडमध्ये माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि फुलंब्री मतदारसंघात शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख रमेश पवार आणि जालना लोकसभेत लक्षवेधी मते मिळवणारे सरपंच मंगेश साबळे हे अपक्ष उमेदवार म्हणून नशीब आजमावत आहेत. जालना जिल्ह्यातील जालना विधानसभेत काँग्रेसचे अब्दुल हाफिज, भाजपचे अशोक पांगारकर, परतूरमध्ये शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल आणि काँग्रेसचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, घनसावंगी मतदारसंघात उद्धव सेनेचे माजी आमदार शिवाजी चोथे, भाजपचे सतीश घाटगे यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली.

हिंगोली मतदारसंघात काँग्रेसचे भाऊराव गोरेगावकर, भाजपचे रामदास पाटील, कळमनुरीत उद्धव सेनेचे अजित मगर यांनी बंडखोरी केली. परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभेत माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची बंडखोरी कायम राहिली आहे. नांदेड जिल्ह्यातील नांदेड उत्तर विधानसभेत भाजपचे मिलिंद देशमुख, नांदेड दक्षिणमध्ये दिलीप कंदकुर्ते, मुखेडमध्ये शिंदे सेनेचे बालाजी खतगावकर, संतोष राठोड, लोह्यात शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आशा शिंदे, प्रा. मनोहर धोंडे यांची अपक्ष उमेदवारी कायम आहे. धाराशिव व लातूर जिल्ह्यात एकही तगडा बंडखोर उभा नसल्याचेही स्पष्ट झाले. या जिल्ह्यांमध्ये बंडखोरी केलेल्या उमेदवारांचे मन वळविण्यात महायुती व महाविकास आघाडीला यश मिळाले आहे.

बीड जिल्ह्यात सर्वाधिक चुरसबीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांसमोर रमेश आडसकर, फुलचंद उर्फ बाबरी मुंडे आणि माधव निर्मळ या अपक्षांनी आव्हान निर्माण केले आहे. तर बीड मतदारसंघात शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, शिवसंग्रामच्या प्रमुख डॉ. ज्योती मेटे यांच्यासह इतर अपक्ष आहेत. आष्टी मतदारसंघात चार वेळा आमदार राहिलेले भीमराव धोंडे यांनी अपक्ष उमेदवार दाखल केली. गेवराईत विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांनी अपक्ष उमेदवारी ठेवली आहे. परळी व केज विधानसभेत मात्र महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये थेट लढत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकkannad-acकन्नडvaijapur-acवैजापूरphulambri-acफुलंब्रीghansawangi-acघनसावंगीjalna-acजालनाpartur-acपरतूरmajalgaon-acमाजलगांवashti-acआष्टीbeed-acबीडgeorai-acगेवराईnanded-north-acनांदेड उत्तरnanded-south-acनांदेड दक्षिण