शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

१२ बोटींच्या खरेदीला मान्यता

By admin | Published: September 15, 2015 12:01 AM

औरंगाबाद : मोमबत्ता तलावामध्ये राबविण्यात येणाऱ्या जलक्रीडा प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात झाली असून, जवळपास १२ बोटींच्या खरेदीला

औरंगाबाद : मोमबत्ता तलावामध्ये राबविण्यात येणाऱ्या जलक्रीडा प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात झाली असून, जवळपास १२ बोटींच्या खरेदीला प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळाली आहे. दोन दिवसांत यासंबंधीच्या ई-टेंडरिंगची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पुढाकार घेतल्यामुळे अल्पावधीत सदरील प्रकल्पास तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता मिळू शकली. ५० लाख रुपयांपेक्षा अधिक खर्चाचा हा प्रकल्प असल्यामुळे नियमानुसार येत्या दोन दिवसांतच ई-टेंडरिंगची प्रक्रिया राबवली जाईल. त्यानंतर जवळपास २५ दिवसांमध्ये दरनिश्चितीनंतर बोटींच्या खरेदीसाठी एक संस्था निवडली जाईल. ज्या तलावात हा प्रकल्प राबविला जाणार आहे, त्या मोमबत्ता तलावाच्या ठिकाणी विविध बांधकामे सुरू केली जातील. मराठवाड्यातील हा पहिलाच आणि तोही गुणवत्तापूर्ण प्रकल्प उभारला जाईल, असा विश्वास उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोळंके यांनी व्यक्त केला. येत्या २३ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेची नियमित सर्वसाधारण सभा होईल. तोपर्यंत बोट खरेदीसाठी संस्था निश्चित होणार नाही.५० लाख रुपयांहून अधिक रकमेचा हा प्रस्ताव असल्यामुळे सर्वसाधारण सभेलाच खर्चाला मान्यता देण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे यासाठी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्याची विनंती जि.प. अध्यक्ष श्रीराम महाजन यांना प्रशासनाच्या वतीने केली जाईल. मोमबत्ता तलावात जलक्रीडेसाठी दोन स्कायजेट बोटी, १२ प्रवासी क्षमतेच्या दोन बोटी, ६ पॅडल बोटी, अशा जवळपास १२ बोटी खरेदी करण्याचा जिल्हा परिषदेचा विचार आहे.