शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
5
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
6
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
7
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
8
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
10
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
11
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
12
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
13
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
14
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
15
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
16
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
17
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
18
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
19
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
20
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?

देशात १०० कोटी डोसचा विक्रम, इकडे निम्म्या जिल्ह्याला लसीचे वावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2021 4:38 PM

औरंगाबाद जिल्ह्यात ५२ टक्के नागरिकांना पहिला डोस देऊन झाला आहे.

ठळक मुद्देलसीकरण टाळण्यासाठी नागरिक अनेक बहाणे करत आहेत कोरोनाला कशाला घाबरायचे? लाटेत काही झाले नाही, मग आता कशाला लस ?

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : ‘कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत फिरलो, पण काहीही झाले नाही, कशाला लस घ्यायची...’, ‘संपला कोरोना, लस घेऊन कोण आजारी पडणार...’ अशी एक ना अनेक कारणे सांगून जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याचे टाळले जात आहे. विशेषत: ग्रामीण भागांत लसीकडे पाठ फिरविली ( half of the Aurangabad district is without vaccinated) जात आहे. ‘मिशन कवच कुंडल’ ही विशेष मोहीमही राबविण्यात आली. परंतु लसरूपी कवच घेण्यापासून अनेक जण चार हात दूरच आहेत.

गुरुवारी देशाने १०० कोटी डोसचा पल्ला देशाने पार केला. या विक्रमी कामगिरीचा देशभरात जल्लोष करण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यात ५२ टक्के नागरिकांना पहिला डोस देऊन झाला आहे. अवघ्या २१ टक्के नागरिकांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. ग्रामीण भागातील काही गावांमध्ये, शहरातील काही भागांत लसीकरणाचे अत्यल्प प्रमाण आहे. ग्रामीण भागासाठी सध्या ७० हजार डोस उपलब्ध आहेत.

२३ हजार गरोदर माता, पण...जिल्ह्यात २३ हजार गरोदर माता आहेत. मात्र यातील केवळ साडेपाच हजार जणींनी लस घेतली आहे. लस घेतल्यावर बाळाला काही झाले तर या चिंतेने लस घेतली जात नाही. मातेची इच्छा असली तरी घरातील इतर जण रोखतात.

लसीकरणाचे मायक्रोप्लॅनिंगलसीकरणाचे मायक्रोप्लॅनिंग करण्यात आले आहे. आता सर्व महाविद्यालयांत लसीकरण शिबिर घेण्यासाठी पत्र देण्यात येत आहे. ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे.- डाॅ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा

लसीकरणास प्राधान्य द्याज्यांना केंद्रापर्यंत जाता येत नाही, अशांना घरी जाऊन लस दिली जात आहे. कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे लस घ्या.- डाॅ. सुधाकर शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी

जिल्ह्यातील लसीकरण :-१६ ते ३१ जानेवारी- ८,२०८- १ ते २८ फेब्रुवारी-२३,११७-१ ते ३१ मार्च- १,३०,३२८-१ ते ३० एप्रिल- २,७७,२३०- १ ते ३१ मे -१,४५,४५०- १ ते ३० जून- २,४६, ०४१,-१ ते ३१ जुलै - ३,३१,९३९-१ ते ३१ ऑगस्ट-३,४९, ५७८-१ ते ३० सप्टेंबर- ५,०३,९८२- १ ते २० ऑक्टोबर-३,३२,३१६

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाCorona vaccineकोरोनाची लस