शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
3
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
4
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
5
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
6
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
7
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
8
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
9
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
10
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
11
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
12
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
13
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
14
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
15
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
16
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
17
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
18
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
19
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
20
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम

छत्रपती संभाजीनगरात लोकसभा निवडणूक काळात रेकॉर्डब्रेक प्रतिबंधात्मक कारवाया

By सुमित डोळे | Published: May 15, 2024 6:28 PM

पोलिस सजग, २२९१ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया, ५२६ जणांवर गुन्हे

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीत अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस विभाग सतर्क झाला होता. मतदान पार पडेपर्यंत पोलिसांना कुठलाही धोका स्वीकारायचा नसल्याने रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी त्यांनी सडेतोड कारवाया केल्या. यात जवळपास २२९१ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया करत गुन्हेगार दिसताच गुन्ह्यात अडकला गेला. यात प्रामुख्याने अवैध शस्त्र, अमली पदार्थाचे सेवन व अवैध दारू विक्रीच्या गुन्ह्यात टवाळखोरांना थेट रेकॉर्डवर घेत तंबीच देण्यात आली होती.

१६ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली. यात पाचव्या टप्प्यात जालना मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान पार पडले. जवळपास साडेपाच हजार पोलिस कर्मचारी, अधिकारी मतदानाच्या सुरक्षेसाठी तैनात होते. मात्र, यात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, कोणी व्यत्यय आणू नये, शिवाय गुन्हेगारांकडून गंभीर गुन्हा घडू नये, यासाठी पोलिस विभागाने आवश्यक ती सर्व पावले उचलली होती. यात प्रामुख्याने रेकॉर्डवरील जवळपास ३ हजार गुन्हेगारांची यादीच पोलिस प्रशासनाने तयार केली होती. त्यानंतर १ एप्रिलपासून त्यांच्या नियमित हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत होते. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवायांसह त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात आले.

असे झाले दीड महिन्यात गुन्हे दाखलप्रकार            गुन्हे             आरोपीदारू ४४०            ४४०अमली पदार्थ ३१            ३१शस्त्र/हत्यार ५३             ५३गुटखा             २             २प्रतिबंधात्मक कारवाया २१९१

गतवर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांची नोंदही वाढली२०२३ च्या एप्रिल मे महिन्याच्या तुलनेत यंदा २०२४ च्या एप्रिल मे महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या कारवायांमुळे शहर पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्याच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यात सर्वाधिक गुन्हे एमआयडीसी वाळूज, सिडको व एमआयडीसी सिडको ठाण्यात दाखल झाले.

१ एप्रिल ते १३ मेदरम्यान दाखल गुन्हेपोलिस ठाणे - गुन्हेएम. वाळूज - १९९सिडको - १३८एम. सिडको - ९७मुकुंदवाडी - ९२छावणी - ९२क्रांती चौक - ७८पुंडलिकनगर - ७१जिन्सी - ६९हर्सूल - ६७वाळूज - ६५सिटी चौक - ६१सातारा - ६०बेगमपुरा - ५३दौलताबाद - ४६जवाहरनगर - ४५उस्मानपुरा - ४४वेदांतनगर - २९

गुन्हेगारांवर वचक होताचपाेलिस आयुक्त, चारही उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व ठाण्यांसोबत मिळून रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होतो. त्यांच्यावरील कारवायांमुळे गुन्ह्यांची संख्या वाढली. परिणामी, निवडणुकात गुन्हेगारांकडून कुठलाही अनुचित प्रकार देखील घडला नाही. प्रतिबंधात्मक कारवायांचा मोठा परिणाम झाला.- संदीप गुरमे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीaurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४