शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

बाजारात टोमॅटो १५० रुपये किलो; शेतकऱ्याच्या हातात पडतात फक्त ७५ रुपयेच

By प्रशांत तेलवाडकर | Published: July 07, 2023 12:44 PM

भाजीमंडईत महिनाभरापूर्वी ५ ते १० रुपये किलोने विक्री होणारा टोमॅटो अचानक १५० रुपयांवर जाऊन पोहोचला.

छत्रपती संभाजीनगर : आजपर्यंतचा भाववाढीचा विक्रम मोडीत काढत टोमॅटो भाजीमंडीत १५० रुपये किलोने विकला जात आहे. टोमॅटो महाग झाले असले तरी पण शेतकऱ्यांच्या खिशात पैसे जात असल्याने सर्वसामान्य ग्राहक शांत बसला आहे. पण वास्तव तसे दिसत नाही, दीडशे रुपयांना जरी टोमॅटो विकले जात असले तरी उत्पादकांच्या हातात ७० ते ७५ रुपयेच पडत आहेत. बाकीची रक्कम वितरण प्रणालीच्या गल्ल्यात जमा होत आहे.

शहरातील भाजीमंडईत महिनाभरापूर्वी ५ ते १० रुपये किलोने विक्री होणारा टोमॅटो अचानक १५० रुपयांवर जाऊन पोहोचला. यामुळे सर्वांचे डोळे पांढरे झाले आहेत. नुसते टोमॅटो नाही तर अन्य भाज्याही ८० ते १०० रुपये किलो दरम्यान विकत आहेत. टोमॅटोचे उत्पादन कमी झाल्याने व मागणी वाढल्याने भाव वाढल्याचे व्यापारी सांगत आहेत. असे असले तरी झालेली भाववाढ ही सर्वसामान्यांच्या पचनी पडत नाही. मात्र, टोमॅटो उत्पादकांना किलोमागे १०० ते १३० रुपये मिळत असतील, अशी धारणा ग्राहकांमध्ये निर्माण झाली आहे. मात्र, आमच्या प्रतिनिधींनी जेव्हा याबाबत शेतकऱ्यांकडे चौकशी केली तेव्हा वेगळेच चित्र समोर आले. बाजारात जरी १५० रुपये भाव असला तरी किलोमागे ७० ते ७५ रुपये मिळत असल्याचे उत्पादकांनी सांगितले. यामुळे या टंचाईचा फायदा कोण उचलते, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शेतकऱ्याच्या नावावर दलाल करतात कमाईमी पाच एकरवर टोमॅटो लावले. मे महिन्यात प्रतिकॅरेट (२५ किलो) ४० ते ५० रुपयांना विकावे लागले. भाववाढीचा काय फायदा. बाजारात १५० रुपये जरी विकत असले तरी उत्पादकाच्या हातात ७० ते ७५ रुपयेच पडत आहेत. पिकविणाऱ्यांना पैसे मिळत नाही आणि खाणाऱ्यांना स्वस्त मिळत नाही, अशी अवस्था असून मधले दलालच मलाई खात आहेत.- वाल्मीक शिरसे टोमॅटो उत्पादक (बहिरगाव,ता.कन्नड)

भाव वाढले पण शेतकऱ्याला नाही फायदानवीन टोमॅटो ऑगस्ट महिन्यात येतील. सध्या टोमॅटोची टंचाई आहे. आमच्याकडेही टोमॅटो नाही. एप्रिल- मे महिन्यात मातीमोल भावात टोमॅटो विकल्या गेले. आता भाव वाढला आहे. मात्र, शेतात टोमॅटो नसल्याने या भाववाढीचा उत्पादकांना काय फायदा. जेव्हा आमच्याकडे टोमॅटो येतील तेव्हा भाव पडतील. हेच तर शेतकऱ्याचे दुखणे आहे.- संजय दांडगे शेतकरी (वरुड काझी)

भाव वाढूनही शेतकऱ्याचे उत्पन्न कमीच१० टन टोमॅटो होते तेव्हा १० रुपये किलोने विकल्या जात होते. आता १ टन टोमॅटो आहे तर त्यास १५० रुपये किलो भाव मिळत आहे. जेव्हा समाधानकारक उत्पादन होते तेव्हा टोमॅटोला एवढा भाव मिळाला असता तर शेतकऱ्यांना फायदा झाला असता. आता २०० रुपये भाव झाला तरी उत्पादनच कमी असल्यावर शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होत नाही.- भगवान कापसे कृषितज्ज्ञ

जाधववाडीत टोमॅटोची ६४ क्विंटलच आवकजाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या फक्त ५० ते ६४ क्विंटल टोमॅटोची आवक होत आहे. यात कन्नड तालुक्यातून व श्रीरामपूरमधून टोमॅटो येत आहे. गुरुवारी ३७०० ते १६००० रुपये प्रतिक्विंटल भाव टोमॅटोला मिळाल्याची माहिती कृउबा समितीने दिली.

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादvegetableभाज्या