लातूर : औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यातील ५१ मतदान केंद्रांवर शुक्रवारी ९१.४५ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात एकूण १० हजार १८९ मतदार आहेत. त्यापैकी ९ हजार ३१८ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून, त्यात ७ हजार ७५८ पुरुष आणि १ हजार ५६० महिला मतदारांचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यातील एकूण ५१ मतदान केंद्रांवर शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून मतदानास प्रारंभ झाला. दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान झाले. दुपारी २ वाजेपर्यंत ६ हजार ५०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यात ५ हजार ३४६ पुरुष, तर १ हजार १६१ महिला मतदार होत्या. ४ वाजेपर्यंत ही टक्केवारी ९१.४५ पर्यंत गेली. शिक्षक मतदारसंघासाठी जिल्ह्यात एकूण १० हजार १८९ मतदार आहेत. ८ हजार ३५३ पुरुष तर १ हजार ८३६ महिला मतदार आहेत. त्यापैकी ७ हजार ७५८ पुरुष मतदारांनी आणि १ हजार ५६० महिला मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.(प्रतिनिधी)
जिल्ह्यात विक्रमी मतदान
By admin | Published: February 04, 2017 12:38 AM