शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

महापालिकेकडून विक्रम; १०० कोटी रुपयांची केली कर वसुली, आर्थिक वर्षाचे आणखीन ३ महिने शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 6:21 PM

Aurangabad Municipal Corporation : आर्थिक वर्ष संपण्यास महापालिकेकडे अजून तीन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे यंदा विक्रमी वसुली होणार आहे.

औरंगाबाद : मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीत महापालिकेने नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. मागील नऊ महिन्यांमध्ये महापालिका प्रशासनाने जवळपास १०० कोटी रुपयांची करवसुली केली. महापालिकेच्या इतिहासात हे प्रथमच घडले आहे.

महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी ९ डिसेंबर २०१९ रोजी महापालिका आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. तेव्हा ३८६ कोटी रुपयांची बिले थकली होती. बिलांसाठी कंत्राटदारांना दररोज महापालिकेसमोर आंदोलने करावी लागत होती. अशा बिकट अवस्थेत पाण्डेय यांनी महापालिकेचा डोलारा सांभाळला. पहिल्या दिवसापासून त्यांनी उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविण्यास सुरुवात केली. कोट्यवधींच्या उधळपट्टीला ब्रेक लावला. अत्यावश्यक कामांना प्राधान्य दिले. लोकप्रतिनिधींचा रोष पत्करून त्यांनी गल्लीबोळात होणारी सिमेंट रस्त्याची कामे बंद केली. मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी उपायुक्त अपर्णा थेटे यांच्याकडे जबाबदारी सोपविली. झोननिहाय वसुलीसाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले. ज्या मालमत्तांना मागील तीन दशकांपासून करच लागला नव्हता त्यांना कर लावण्यात आला. वर्षानुवर्षे ज्या मालमत्तांना जुन्या पद्धतीने कर लावण्यात येत होता, त्या वाढीव मालमत्तांना कर लावला. वसुलीत निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘बूस्टर’ डोस देण्यात आला. वेळप्रसंगी कंत्राटी कर्मचाऱ्यांना थेट बडतर्फही करण्यात आले. 

याचे परिणाम आता दिसून येत आहेत. १ एप्रिल ते ३० डिसेंबर २०२१ पर्यंत महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ता कर, पाणीपट्टीच्या माध्यमातून ९७ कोटी ३६ लाख रुपये आले आहेत. गुरुवारी एका दिवसात महापालिकेने चार कोटी पन्नास लाख रुपये वसूल केले हे विशेष. उद्या ३१ डिसेंबर रोजी महापालिका शंभर कोटी रुपये पर्यंत वसुलीचा आकडा गाठणार आहे.

२०१८ मध्ये ९० कोटी...मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून महापालिकेने २०१८ मध्ये अवघ्या नऊ महिन्यात ९० कोटी रुपये वसूल केले होते. यंदा हा आकडा १०० कोटीपर्यंत पोहोचला आहे. आर्थिक वर्ष संपण्यास महापालिकेकडे अजून तीन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे यंदा विक्रमी वसुली होणार आहे.

उद्दिष्ट कमी होण्याची शक्यतापालिकेने अर्थसंकल्पात यंदा मालमत्ता कराचे ४६८ कोटी तर पाणीपट्टीचे १०८ कोटींचे उद्दिष्ट निश्चित केले. सुधारित अर्थसंकल्पात हे उद्दिष्ट आणखी कमी होण्याची शक्यता आहे, कारण कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली आहे. कोरोना संसर्गाचा परिणाम वसुलीवर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकर