लातूर : मनपा अस्तित्वात आल्यानंतर गेल्या साडेचार वर्षांत अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी विविध कामांसाठी अनामत रक्कम उचलली. मात्र २७ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अनामत रकमेचे समायोजन बिल सादर केले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून अनामत रक्कम वसूल करण्यात येत आहे. या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतलेली अनामत रक्कम फेब्रुवारी महिन्याच्या वेतनातून वसूल केली जाणार आहे. दरम्यान, ज्यांनी समायोजन बिल सादर केले नाही, त्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. परंतु, नोटिशीला समाधानकारक उत्तर न दिल्याने लेखा विभागाने वेतनातून अनामत वसूल करण्यास सुरुवात केली आहे.
अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनातून अनामत रक्कम वसुलीची कारवाई
By admin | Published: February 21, 2017 10:29 PM