- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : कोरोना काळात लावलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक नागरिकांनी, वाहनधारकांनी नियमांचे उल्लंघन केले. महापालिकेने मास्क न लावलेल्या नागरिकांवर कारवाई करीत १ काेटी ४६ लाख रुपये दंड वसूल केला. पोलिसांनी १ कोटी २ लाख रुपये वाहनधारकांकडून वसूल केले.
कोरोनाच्या पहिल्या दुसऱ्या लाटेत नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत होते. मात्र, असंख्य नागरिक नियमांकडे दुर्लक्ष करताना आढळून आले. पहिल्या लाटेत कोरोनाबद्दल प्रचंड भीती नागरिकांमध्ये होती. घराबाहेर पडताना अनेकदा विचार करावा लागत होता. दुसऱ्या लाटेत नागरिकांनी कोरोनाला गांभीर्याने घेतले नाही. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्यात जास्त रुग्णांचा मृत्यू झाला. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करावा. फिजिकल डिस्टन्स ठेवावे, गर्दी करू नये, असे साधे सोपे नियम ठरवून देण्यात आले आहेत. असंख्य नागरिक या नियमांकडे दुर्लक्ष करताना आढळून आले. सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावलेल्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी मनपाने नागरी मित्र पथक स्थापन केले. पथकातील ७०पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी दररोज कारवाई केली. प्रत्येक नागरिकाला प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारण्यात येत होता. आत्तापर्यंत या पथकांनी १ कोटी ४६ लाख रुपये दंड वसूल केला. त्याचप्रमाणे पोलिसांनीही मागील तीन महिन्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली. २९ हजार ४८५ केसेस करण्यात आल्या. १ कोटी २ लाख २२ हजार १६०० रुपये वसूल केले.
हेल्मेटच्या सर्वाधिक केसेसपोलिसांनी हेल्मेटचा वापर न केल्याबद्दल ११ हजार १६१ नागरिकांना दंड आकारला. त्यांच्याकडून ५ लाख ५८ हजार ५०० रुपये वसूल करण्यात आले. चारचाकी वाहन चालवित असताना सीट बेल्टचा वापर न केल्याने ५ हजार ३८२ वाहनधारकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून १० लाख ७६ हजार रुपये दंड वसूल केला. फॅन्सी नम्बर प्लेट वापरणाऱ्यांकडून ६ लाख ७५ हजार रुपये दंड वसूल केला.
वाहतूक, कोरोनाचे नियम सुरक्षेसाठीचवाहतुकीचे आणि कोरोनाचे नियम नागरिकांच्या सुरक्षेसाठीच आहेत. मात्र, असंख्य नागरिक या नियमांचे पालन करायला तयार नाहीत. महापालिका, पोलिसांकडून वारंवार या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येते. त्याचा काहीच उपयोग होत नाही.
व्यापक प्रमाणात कारवाईलॉकडाऊन काळात कमीत कमी नागरिक रस्त्यावर असावेत, यासाठी प्रत्येक वाहनधारकांची नाकाबंदीत विचारपूस केली जात होती. विनाकारण वाहन घेऊन बाहेर पडलेल्या चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी लॉकडाऊनचा कालावधी जास्त होता. यामुळे व्यापक प्रमाणात कारवाई झाली.- मुकुंद देशमुख, शहर वाहतूक निरीक्षक
असा झाला दंड वसूल :
वाहन चालवताना मोबाइलचा वापर - ४, ३४, ०००विनासीट बेल्ट वाहन चालविणे -१०,७६,४००मास्कचा वापर न करणे - १ कोटी ४६ लाखहेल्मेटचा वापर न करणे - ५,५८,५००ट्रिपल सीट - ५, ३४, २००फॅन्सी नंबर प्लेट - ६,७५,२००नो पार्किंग - ३,५२,८००विनालायसन्स - १५,६८,५००