शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"
2
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
3
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
4
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
5
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
7
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
8
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
9
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
10
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
11
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
12
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
13
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
14
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
15
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
16
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
17
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
18
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
19
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
20
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा

'७५ हजार पदांची भरती होणार'; शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणप्रसंगी मुख्यमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 6:56 PM

मुख्यमंत्री शिंदे यांनी कुलगुरू प्रमोद येवले यांनी केलेल्या विविध मागण्यांची पूर्तता करण्याची ग्वाही यावेळी दिली.

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सायंकाळी शानदार सोहळ्यात उद्घाटन झाले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात ७५ हजार नोकर भरती करण्यात येईल, अशी घोषणा केली. 

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा ११ फुट उंच अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे आज सायंकाळी शानदार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी कुलगुरू प्रमोद येवले, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, उद्योग मंत्री उद्या सामंत, सहकारमंत्री अतुल सावे आदींची उपस्थिती होती. अनावरणानंतर विद्यापीठाच्या नाट्यगृहातील कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी संबोधित केले.

ते म्हणाले, शिवाजी महाराजांचे भोसले घराणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी औरंगाबाद आहे, असा विलक्षण योगायोग आहे. विद्यापीठातील रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांच्या पुतळ्यातून येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत राहील, असेही ते म्हणाले. 

मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी कुलगुरू प्रमोद येवले यांनी केलेल्या विविध मागण्यांची पूर्तता करण्याची ग्वाही यावेळी दिली. याचवेळी प्रेक्षागृहात बसलेल्या विद्यार्थ्यांच्या मागणीवरून मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यात लवकरच मंजूर पदांची भरती करण्यात येईल. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानिमित्त राज्यात ७५ हजार नोकरीभरती करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEknath Shindeएकनाथ शिंदे