लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील लिंबाळा परिसरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयटीआय उत्तिर्ण विद्यार्थ्यांसाठी १८ जुलै रोजी भरती मेळाव्याचे अयोजन करण्यात आले आहे. रेमन्ड लक्सरी कॉटन लिमिटेड अमरावतीतर्फे सदर मेळावा घेण्यात येणार आहे. यासाठी उमेदवार दोन वर्ष कालावधीच्या आयटीआय अभ्यासक्रमात उत्तिर्ण असणे अनिवार्य आहे. कंपनीतर्फे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार असून प्रशिक्षण कालावधीमध्ये ५ हजार ७०० रूपये शिकाऊ उमेदवार म्हणून वेतन दिले जाणार आहे. शिवाय उमेदवारांना आवश्यकतेनुसार नोकरीमध्ये कायम करून घेतले जाणार आहे. भरती प्रक्रिया चार भागात विभागण्यात आली आहे. यामध्ये शारीरिक चाचणीत उंची १६५ से. मी., वजन ४५ किलो, तसेच लेखी व तांत्रिक चाचणी, मुलाखत घेतली जाईल. उमेदवाराचे वय १८ ते २४ वर्षे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने शैक्षणिक कागदपत्रांसह भरती मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य एस. पी. भगत, एस. एम. राका, यू. आर. बिहाऊत, ए. बी. भुसारे, ए. डी. रावते आदींनी केले.
आयटीआय उत्तीर्णांसाठी १८ रोजी भरती मेळावा
By admin | Published: July 14, 2017 12:03 AM