लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भीमा-कोरेगाव घटनेचे पडसाद मंगळवारी जिल्ह्यात उमटले. जिल्ह्यातील बससेवा बंद राहिल्याने प्रवाशांसह रोज अप-डाऊन करणाºया विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. पैठण, गंगापुरात दगडफेकीच्या घटना घडल्या, खुलताबादेत निषेध रॅली काढण्यात आली, सिल्लोडमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, तर इतर तालुक्यांत शांततेत बंद पाळून समाजबांधवांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसील व पोलीस प्रशासनाला दिले.सिल्लोड शहरात रास्ता रोकोसिल्लोड : भीमा-कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ सिल्लोड शहरात मंगळवारी कडकडीत बंद पाळून आंबेडकर चौकात एक तास रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती.घटनेचा निषेध करून समाजबांधवांनी नायब तहसीलदार संजय सोनवणे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार, पोलीस निरीक्षक भागीरथ देशमुख यांनी शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. एसआरपी, दंगा काबू पथक सिल्लोड शहरात तैनात करण्यात आल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. काही किरकोळ प्रकार वगळता शांततेच्या मार्गाने संविधानपे्रमींनी घटनेचा निषेध केला.सिल्लोड आगार व औरंगाबाद- जळगाव रस्त्यावर धावणाºया सर्व एसटी बस पोलिसांनी सकाळी ११.३० वाजेपासून बंद केल्या होत्या. सकाळी घरातून बाहेर पडलेले प्रवासी सिल्लोड बसस्थानकावर अडकले होते. बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. सिल्लोड तालुक्यात दररोज ग्रामीण भागातून ७ हजार ५०० विद्यार्थी अप-डाऊन करतात. विद्यार्थ्यांचे हाल होऊ नयेत म्हणून सिल्लोड आगाराने सर्वत्र शांतता झाल्यावर दुपारी ३ वाजता वांगी, भराडी, गेवराई सेमी, पळशी, आव्हाना, अजिंठा, जळगावकडील बस सुरू केल्या होत्या. त्यामुळे चार तास अडकलेले प्रवासी व विद्यार्थी घरी पोहोचले. पोलिसांनी बस सोडू नयेत, असे सांगितले होते; पण प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून टप्प्याटप्प्याने सर्व बस नियोजित मार्गावर सोडण्यात आल्या असल्याची माहिती आगारप्रमुख विजय बोरसे यांनी दिली.यावेळी संजय आरके, अमित आरके, विठ्ठल शिरसाठ, राजेश्वर आरके, प्रभाकर पारधे, अॅड. अशोक तायडे, विनोद पगारे, वैभव तायडे, मनोहर आरके, योगेश सुरडकर, मंगेश आरके, शरद आरके, रवी आरके, संदीप सुरडकर, स्वप्नील सुरडकर, राहुल दांडगे, राहुल दाभाडे आदींसह संविधानप्रेमी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिल्लोड ग्रामीण, अजिंठा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही किरकोळ प्रकार वगळता शांतता होती.पैठण शहरात दगडफेकीने नुकसानपैठण : भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी पुकारण्यात आलेल्या बंदला पाठिंबा देत शहरातील व्यापाºयांनी कडकडीत बंद पाळला. दरम्यान, जमावातील काही तरुणांनी नाथमंदिर परिसरात दगडफेक करून दुकानांची तोडफोड केली. नाथमंदिर पडशाळेच्या पत्र्यांवरही दगडफेक झाली. कीर्तन हॉलच्या खिडकीच्या काचा फोडल्या. यामुळे परिसरातील व्यापाºयांना सोबत घेत विविध मराठा संघटनांनी मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जमा होऊन संबंधित समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी केली.आंबेडकरी अनुयायी व दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी सकाळी भीमा-कोरेगाव घटनेचा निषेध करण्यासाठी शहरातून पदयात्रा काढली व पैठण बंदचे आवाहन केले. आवाहनास प्रतिसाद देत शहरातील व्यापाºयांनी पटापट आपापली दुकाने बंद केली. दरम्यान, या पदयात्रेत विविध भागांतून तरुणांचे आक्रमक जमाव येऊन दाखल होत होते.दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास जमावातील काही घोळक्यांनी नाथमंदिर व परिसरातील व्यापाºयांना लक्ष्य करीत परिसरात घुसून तेथील दुकानांवर दगडफेक केली. अचानक झालेल्या हल्ल्याने व्यापारी व महिला भांबावून गेल्या. परिसरात मोठी धावपळ उडाली. अनेक दुकानांतील साहित्याची, काऊंटरची तोडफोड करण्यात आली. फूल व नारळाची दुकाने उधळून लावण्यात आली. नाथमंदिराच्या पडशाळेवर दगडफेक करण्यात आली. कीर्तन हॉलच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. यासोबतच शहरातील टपाल खात्याच्या कार्यालयावरही दगडफेक करण्यात आली. यादरम्यान कोर्ट रोडवर कारवर दगडफेक करण्यात आली. या सर्व घटनांनी शहरात तणाव निर्माण झाला. नाथमंदिर परिसरात झालेल्या हल्ल्याचा निषेध व समाजकंटकांवर कारवाई करा, या मागणीसाठी विविध मराठा संघटना व परिसरातील व्यापाºयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मोठा जमाव जमा झाला.पैठण येथे मोठा पोलीस बंदोबस्त हजर झाला. यावेळी पोलीस ठाण्यात जमा झालेल्या व्यापारी व नागरिकांना माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, आतिष गायकवाड, शहादेव लोहारे, गणेश पवार, किशोर सदावर्ते, ज्ञानेश्वर जाधव आदींसह उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड शांततेचे आवाहन करीत होते. योग्य त्या कारवाईचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर नागरिकांनी पोलीस ठाणे सोडले. गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सायंकाळी शहरातील काही दुकाने सुरू झाली होती. यानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.शाळांना दिली सुटीशहरात दगडफेक होऊन तणाव निर्माण झाल्याचे समजताच शहरातील शाळांना सुटी देण्यात आली. बाहेरगावाहून शिक्षणासाठी पैठण येथे आलेल्या विद्यार्थ्यांना गावी परत जाण्यासाठी बस व इतर वाहने बंद असल्याने गैरसोयीचा सामना करावा लागला. यात मुली घाबरून गेल्या होत्या. बसस्थानकावर जमा झालेल्या मुलींना भाऊसाहेब पिसे, अप्पासाहेब गायकवाड, जितू परदेशी आदींनी धीर दिला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत एक एक बस सोडून सर्व विद्यार्थ्यांची पैठण आगाराने सोय केली.प्रशासन कमी पडले, तर कारवाई करणारपैठणमध्ये झालेल्या दगडफेक व इतर घटनांत पोलीस प्रशासन कमी पडले असेल, तर ही बाब चौकशीतून पुढे येणार आहेच. याबाबत संबंधितांविरोधात आपण कारवाई करणार असल्याचे पोलीस अधिकाºयांनी पत्रकार परिषदेत सांगितले.पाच बस फोडल्या४पैठण आगाराच्या पाच बसच्या काचा विविध ठिकाणी झालेल्या दगडफेकीत फुटल्या आहेत. यात एमएच-२० बीसी-३३११, एमएच-२०-१९६२, एमएच-२०-८८५, एमएच-२०-७४५६, एमएच-२०-०५९३ या बसचा समावेश आहे. बसवर कांचनवाडी, गेवराई, औरंगाबाद आदी ठिकाणी दगडफेक झाली असल्याचे पैठण आगारातून सांगितले.फुलंब्रीत आठवडी बाजारावर परिणामफुलंब्री : तालुक्यात बुधवारी फुलंब्री शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. मंगळवारी बसेस न आल्याने प्रवाशांचे हाल झाले.४आठवडी बाजारही ओस पडला होता. अनेक व्यापारी व बाजारकरुंनी बाजाराकडे पाठ फिरवली. मंगळवारी तहसीलदार संगीता चव्हाण यांना दलित समाजबांधवाच्या वतीने निवेदन देण्यात आले.४निवेदनावर जनार्दन शेजवळ, राजू प्रधान, अमित भुईगळ, रोशन अवसरमल, बाबासाहेब गंगावणे, गौतम गंगावणे, भगवान गंगावणे, अजय गंगावणे, जयदीप शेजवळ, बाळकृष्ण साळवे, रागा भुईगळ, बाळू गंगावणे, मनोहर प्रधान, सुरेश गंगावणे, सुनील सरोदे, देवेंद्र गंगावणे, विशाल गंगावणे यांच्या सह्या आहेत. फुलंब्री, वडोदबाजार पोलिसांनी तालुक्यात चोख बंदोबस्त ठेवला होता.पाचोड स्थानकात थांबविल्या बसगाड्यापाचोड : पाचोड येथील रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध करीत पाचोड पोलीस ठाण्यात जाऊन सपोनि. महेश आंधळे यांना निवेदन दिले.४दरम्यान, बीड, सोलापूर , लातूर भागातून औरंगाबादला जाणाºया बसेस पाचोडलाच थांबविल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. सपोनि. महेश आंधळे यांनी बसस्थानकात जाऊन प्रवाशांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व बसेस कडेकोट बंदोबस्तात पाचोड हद्दीपर्यंत पांढरी पिंपळगावपर्यंत पोहचविल्या. बाजार समितीचे सभापती राजू भुमरे व आंधळे हे रस्त्यावर फिरून शांतता राखण्याचे आवाहन करीत होते. पाचोड बसस्थानकात वाहतूक नियंत्रक अशोक डोंगरे यांनी बसेस स्थानकात थांबवून ठेवल्या होत्या.गंगापुरात बसवर दगडफेकगंगापूर : गंगापूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापाºयांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. यावेळी तहसीलदार व पोलीस निरीक्षक चंदन इमले यांना निवेदन देण्यात आले. शाळांना सुटी देण्यात आली होती.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जमावाकडून बसवर दगडफेक करण्यात आली. यात बसचालक जखमी झाला. बाहेर गावी गेलेल्या सर्व बसेस पोलीस बंदोबस्तात आगारात जमा केल्या. बसफेºया बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनावर बाबा भिवसने, बापू खाजेकर, जितेंद्र शिरसाठ, मधुकर मोकळे, सागर दळवी, संदीप खाजेकर, राहुल वानखेडे, विश्वजीत चव्हाण, योगेश शेळके, अशोक पाटील, जयेश निरपळ, बाबा दुशिंग, राहुल खाजेकर, सुनील खाजेकर, प्रदीप आमराव, वैभव खाजेकर, राहुल कांबळे, विशाल खाजेकर, रोहन शिरसाठ, सागर खाजेकर, आकाश भिंगारे, निलेश खाजेकर, आकाश जाधव, शिवा जाधव, भारत थोरात, विशाल माघाडे, किरण शिरसाठ, दयानंद खाजेकर, अण्णासाहेब खाजेकर, अमोल वंजारे, रामेश्वर मकासरे, बाबासाहेब गजभिव, सिध्दार्थ साळवे आदींच्या स्वाक्षºया आहेत.खुलताबाद : खुलताबाद येथील दलित बांधवांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते तहसील
‘लालपरी’ थांबली; प्रवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 12:23 AM