शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

उपचार सुविधांबरोबर प्रतिबंधात्मक उपायांवर भर- जे. पी.  नड्डा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2018 1:41 PM

देशात आरोग्यासाठी उपचार सुविधांबरोबर प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिला जात आहे. स्वच्छ भारतसह आरोग्यदायी भारत होईल.

औरंगाबाद : देशात आरोग्यासाठी उपचार सुविधांबरोबर प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिला जात आहे. स्वच्छ भारतसह आरोग्यदायी भारत होईल. औरंगाबादेतील शासकीय कर्करोग रुग्णालय दूर पर्यंतच्या रुग्णांसाठी आधार ठरेल, असे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री जे. पी.  नड्डा म्हणाले.मराठवाड्यासह लगतच्या भागातील गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरणाऱ्या शासकीय कर्करोग रुग्णालयास राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा देण्यात आला आहे. या राज्य कर्करोग संस्थेचे भूमिपूजन आणि भाभा ट्रॉन-२ युनिटचे उद्घाटन रविवारी (दि.११) केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री जे. पी.  नड्डा यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती होती. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे,  महापौर नंदकुमार घोडेले, आ.  अतुल सावे, आ. सुभाष झांबड,आ. प्रशांत बंब,  टाटा मेमोरिअल रुग्णालयाचे शैक्षणिक संचालक डॉ. कैलास शर्मा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे,   सहसंचालक डॉ. सुरेश बारपांडे, जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर,डॉ. भागवत कराड यांची प्रमुख उपस्थित होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यअधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांची उपस्थिती होती.तोगडिया यांच्याविषयी बोलण्याचे टाळलेदेशाचे आरोग्य अतिदक्षता विभागात दाखल आहे. सरकारी आरोग्य व्यवस्थेत पुरेसे डॉक्टर नाहीत, परिचारिका नाहीत. इमारत आहे तर यंत्रसामग्री नाही. यंत्र असेल तर ते चालू नाही. केंद्र सरकारने आरोग्य विमा देण्याची जाहीर केलेली योजना योग्य असली तरी त्यासाठी लागणारा विम्याचा हप्ता कोठून आणणार, असा प्रश्न विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया औरंगाबादेत म्हणाले होते. पत्रकार परिषदेत प्रवीण तोगडिया यांनी केलेल्या वक्तव्याविषयी नड्डा यांनी बोलण्याचे टाळले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद