वाळूज महानगर : पंढरपुरातील अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूर बचाव कृती व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.
पंढरपूरातील शासकीय जमिनीवर झालेले अतिक्रमण निष्कासित करण्याचे आदेश न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा महसूल विभागाने पंढरपूरातील जवळपास अडीचशे अतिक्रमणधारक व्यवसायिकांना नोटिसा बजावून अतिक्रमण काढून घेण्यास सांगितले आहे. या गावात अनेक शासकीय योजना राबविल्या असून, लोकप्रतिनिधींचा निधीही खर्च केला आहे. त्यामुळे शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमाकुल करण्याची मागणी निवेदनात केली आहे.
यावेळी माजी जि.प. सदस्य अनिल चोरडिया, संतोष चोरडिया, रहीम पठाण, प्रविण मुनोत, जितेंद्र बेदमुथा, सुमीत कुचेरिया, , जि.प. सदस्य रमेश गायकवाड, नगरसेवक कैलास गायकवाड, सरपंच अक्तर शेख, उपसरपंच महेंद्र खोतकर, उदय देशमुख, मेहबूब चौधरी, अनिल कोतकर आदी उपस्थित होते.