छत्रपती संभाजीनगर : वीज ग्राहकांना सेवासुविधांचा घरबसल्या लाभ घेता यावा, यासाठी महावितरणने आपल्या सर्व सेवा ग्राहकाभिमुख करत ऑनलाइन केल्या. या ऑनलाइन सेवांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना महावितरणने मोबाइल ॲपसह विविध संकेतस्थळांचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे; परंतु मराठवाड्यातील २७ लाख ग्राहक गो ग्रीन सुविधेकडे पाठ फिरवत आहेत. सर्व लघुदाब ग्राहकांना ऑक्टोबर २०१८ पासून प्रतिबिल १० रुपये सवलत देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मराठवाड्यात २७ लाख तीन हजार १५३ ग्राहक या सेवेपासून वंचित राहिले आहेत.
गो ग्रीनची नोंदणी करावीतुम्हाला माहीत आहे का? कशातून गो ग्रीन? या सर्व सुविधा उपलब्ध असतानाही महावितरणतर्फे ग्राहकांना छापील वीज बिलही उपलब्ध करून देण्यात येते, परंतु जे पर्यावरणप्रिय ग्राहक गो ग्रीन सुविधांचा पर्याय निवडतात, अशा ग्राहकांना छापील बिलाऐवजी ई मेलवर वीज बिल उपलब्ध करून दिले जाते. मात्र यासाठी ग्राहकांना आपली नोंदणी करून घेणे गरजेचे आहे. ऑनलाईन बिल भरणाऱ्या ग्राहकांना रुपये ५०० च्या बिलापर्यंत ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. यात क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय, बीएचआयएम, इंटरनेट बॅकिंग, मोबाईल बॅकिंग, मोबाईल वॉलेट इ. माध्यमातून ऑनलाईन बिल भरता येईल. गो ग्रीनची नोंदणी करावी.- प्रकाश खपले, सहव्यवस्थापकीय संचालक, महावितरण प्रादेशिक कार्यालय