शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

दिलासादायक ! मराठवाड्यातील शाळांच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी २०० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 6:19 PM

Varsha Gaikwad : पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील मोडकळीला आलेल्या ७१८ शाळांमधील वर्गखोल्यांची पुनर्बांधणी तसेच १०५० शाळांच्या दुरुस्तीचे काम

ठळक मुद्देराजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानअभियानांतर्गत ८० टक्के रक्कम राज्य सरकार देणार दहा टक्के रक्कम संबंधित जिल्हा परिषद उर्वरित दहा टक्के रक्कम लोकवर्गणीतून किंवा सीएसआर फंडातून

मुंबई/औरंगाबाद : राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानांतर्गत मराठवाड्यातील शाळांची पुनर्बांधणी आणि वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी २०० कोटींच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. ( relief ! 200 crore for repair of schools in Marathwada) 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील वर्गाची पुनर्बांधणी, दुरुस्तीसाठी राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियान राबविण्यास तसेच याच्या पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील मोडकळीला आलेल्या ७१८ शाळांमधील वर्गखोल्यांची पुनर्बांधणी तसेच १०५० शाळांच्या दुरुस्तीच्या कामासाठी २०० कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या अभियानांतर्गत ८० टक्के रक्कम राज्य सरकार देणार आहे तर दहा टक्के रक्कम संबंधित जिल्हा परिषद आणि उर्वरित दहा टक्के रक्कम संबंधित शाळा व्यवस्थापन समितीकडे लोकवर्गणीतून किंवा सीएसआर फंडातून उभी केली जाणार आहे. या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा मंत्री वर्षा गायकवाड ( Varsha Gaikwada ) यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील इतर विभागातही ही योजना राबविण्यात येणार असल्याचेही शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - पीक विमा कंपनीला मोठा नफा, शेतकऱ्यांना मिळू शकतात हेक्टरी १० हजार ?

संबंधित जिल्ह्यातील प्रस्तावित शाळांच्या वर्गखोल्यांची पुनर्बांधणी व दुरुस्तीची मोहीम राबविण्याची जबाबदारी तसेच प्राधान्यक्रम ठरविण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील अंमलबजावणी समितीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित गावचे सरपंच, शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीतील एक सदस्य आणि जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांचा समावेश असणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध असणे ही चांगल्या शाळेची ओळख आहे आणि त्या पुरविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. स्वराज्यजननी माँसाहेब जिजाऊ यांच्या विचारांतून प्रेरणा घेत ‘राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियान’ हा उपक्रम आम्ही सुरू करत आहोत, असे गायकवाड यांनी या संदर्भातील टि्वटमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादzp schoolजिल्हा परिषद शाळाfundsनिधीEducationशिक्षणStudentविद्यार्थीVarsha Gaikwadवर्षा गायकवाड