शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

दिलासादायक ! ‘म्युकरमायकोसिस’मुक्तीकडे औरंगाबादची वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:50 PM

mucormycosis in Aurangabad : घाटी रुग्णालयात सहजपणे इंजेक्शन उपलब्ध होत असल्याने राज्यभरातून रुग्ण उपचारासाठी औरंगाबादेत दाखल झाले.

ठळक मुद्दे जिल्ह्यात ८६ टक्के रुग्णांनी घेतले यशस्वी उपचारकोरोनाच्या ९० टक्के रुग्णांना या आजाराला तोंड द्यावे लागले.

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : कोरोनाच्या ( corona virus ) दुसऱ्या लाटेत कोरोनाबरोबरच ‘म्युकरमायकोसिस’ने ( Mucormycosis ) राज्यभरात एकच हाहाकार उडवला होता; पण औरंगाबाद जिल्ह्यात ८६ टक्के रुग्णांनी यशस्वी उपचार घेऊन या आजारावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या २४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, आता ‘म्युकरमायकोसिस’चे नवे रुग्ण आढळून येत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे ‘म्युकरमायकोसिस’मुक्तीकडे औरंगाबादची वाटचाल सुरू आहे, असे म्हटले तर वावगे नाही. ( Relief ! Aurangabad on its way to getting rid of ‘mucormycosis’)

कोरोनाच्या ९० टक्के रुग्णांना या आजाराला तोंड द्यावे लागले. राज्यभरासह जिल्ह्यात मे महिन्यात या आजाराच्या रुग्णांच्या उपचारासाठी लागणारे इंजेक्शन अपुरे पडले. रुग्णांच्या नातेवाइकांना आणि खाजगी रुग्णालयांना इंजेक्शनसाठी भटकंती करावी लागली. मात्र, ही स्थिती आता नाही. कारण नवे रुग्ण आढळत नसून, जिल्ह्यात सध्या २४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली.घाटी रुग्णालयात सहजपणे इंजेक्शन उपलब्ध होत असल्याने राज्यभरातून रुग्ण उपचारासाठी औरंगाबादेत दाखल झाले. या आजारामुळे डोळे काढावेच लागतात, हा समज घाटीतील डाॅक्टरांनी खोटा ठरविला. तब्बल १५४ वर रुग्णांचे डोळे वाचविण्यात येथील डाॅक्टरांना यश आले. घाटीत सध्या ४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती कान, नाक, घसा विभागप्रमुख डाॅ. सुनील देशमुख यांनी दिली.

नवे रुग्ण नाहीतसध्या ‘म्युकरमायकोसिस’चे नवीन रुग्ण नाहीत. जे पूर्वीचे आहेत, तेच रुग्ण सध्या आहेत. लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे. प्रतिकारशक्ती निर्माण होत आहे. त्याचा काहीसा फायदा होत आहे.-डाॅ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा शल्यचिकित्सक

औरंगाबादेतील म्युकरमायकोसिस रुग्णांची स्थिती :एकूण रुग्ण- १,२४८रुग्णालयातून सुटी झालेले रुग्ण- १,०७१एकूण मृत्यू - १५३उपचार सुरू असलेले रुग्ण- २४

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसAurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी