लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : हज यात्रा करणाऱ्या यात्रेकरूंनी हजचे पावित्र्य कायम ठेवावे, यात्रेत ज्या पद्धतीचे आचरण ठेवण्यात येते तसेच आचरण यात्रा संपल्यावर संपूर्ण आयुष्यात ठेवावे. हज यात्रेचे धार्मिक महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे आज जामिया इस्लामिया काशिफ-उल-उलूमचे प्रमुख मौलाना मोईजोद्दीन फारुकी नदवी यांनी व्यक्त केले.‘मरकज-ए-खिदमात-ए-हुज्जाज कमेटी’तर्फे दरवर्षी मराठवाडा व इतर जिल्ह्यांतील हज यात्रेकरूंसाठी पाच सत्रांमध्ये प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येते. यंदाचे पाचशे प्रशिक्षण शिबीर शनिवारी जामा मशीद परिसरातील सईद हॉल येथे सुरू झाले. रविवारी या शिबिराचा समारोप करण्यात आला. यावेळी मौलाना फारुकी उपस्थित दोन हजारांहून अधिक हज यात्रेकरूंना मार्गदर्शन करीत होते.‘मरकज-ए-खिदमात-ए-हुज्जाज कमेटीचे मौलाना नसिमोद्दीन मिफ्ताही यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, हज यात्रेसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी शिकणे खूप महत्त्वाचे आहे. यात्रेतील धार्मिक बाबींचा सविस्तरपणे तपशील त्यांनी सांगितले. जामा मशिदीचे इमाम हाफेज जाकेर साहब यांनी सकाळी कुराणपठण केले. डॉ. नुरूल फैसल यांनी नात सादर केली. डॉ. रहिमोद्दीन यांनी ‘हज यात्रेची तयारी’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. यात्रेत सतर्कता कशी ठेवावी, येणाºया छोट्या-मोठ्या अडचणी कोणत्या, त्या कशा सोडवाव्यात यासंबंधीही मार्गदर्शन करण्यात आले. ‘मरकज-ए-खिदमात-ए-हुज्जाज कमेटीचे पदाधिकारी मिर्झा रफत बेग यांनी विमानतळावर यात्रेकरूंनी काय करावे याची संपूर्ण माहिती देण्यात आली. प्रा. अब्दुल खालिक यांनी मार्गदर्शन केले.लसीकरण आजपासून‘मरकज-ए-खिदमात-ए-हुज्जाज कमेटी’च्या माध्यमातून हज यात्रेकरूंना २ जुलैपासून लसीकरण, पोलिओचा डोस देण्यात येणार आहे. जामा मशीद परिसरातील इनामा हॉल येथे हज यात्रेकरूंची व्यवस्था करणयात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण, पोलिओ डोस देण्यात येणार आहे.
हज यात्रेचे धार्मिक महत्त्व अनन्यसाधारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 12:19 AM
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : हज यात्रा करणाऱ्या यात्रेकरूंनी हजचे पावित्र्य कायम ठेवावे, यात्रेत ज्या पद्धतीचे आचरण ठेवण्यात येते ...
ठळक मुद्देमौलाना मोईज फारुकी : हज यात्रेकरूंच्या दोनदिवसीय प्रशिक्षणाचा समारोप