लासूर स्टेशन : रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या पायाभरणीपासून ते बांधकाम पूर्ण होईपर्यंत अहोरात्र मेहनत घेणाऱ्या ९६ कामगारांचा सन्मान करून कारभारी जाधव यांच्या हस्ते नवीन जागेत स्थलांतरित झालेल्या माणिक स्किन केअर हॉस्पिटलचे उद्घाटन झाले.
माणिक हॉस्पिटलचे संचालक त्वचारोगतज्ज्ञ डॉ. गणेश जाधव हे सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी ओळखले जातात. रुग्णालयात आलेल्या प्रत्येकाला ते मोफत वृक्ष भेट देऊन त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन करतात. त्यांचा हा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. त्वचारोगावरील अत्याधुनिक उपचार यंत्रसामुग्रीसहित सुसज्ज नूतन इमारतीत स्थलांतरित झालेल्या माणिक स्किन केअर हॉस्पिटलचे उद्घाटन डॉ. जाधव यांनी कुठलाही बडेजाव न करता आजोबा कारभारी जाधव यांच्या हस्ते केले. डॉ. जाधव यांनी वेगळेपणा जपत दवाखान्याचे बांधकाम करणाऱ्या ९६ कारागिरांना कपडे देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. शिवाय, या कारागीर प्रमुखांचे नाव व नंबर कृतज्ञनामा हॉस्पिटलच्या दर्शनी भागावर प्रसिद्ध करून नवीन पायंडा पाडला.
020921\aher madhukar aher_img-20210831-wa0025_1.jpg
कामगारांचा सन्मान करून कामगारांचा सन्मान