औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील माजी नाट्यशास्त्र विभागाचे माजी प्रमुख तथा प्रख्यात रंगकर्मी डॉ शशिकांत नागेश्वरराव बऱ्हाणपुरकर यांचे शनिवारी (दि. ११ ) पहाटे एमजीएम रुग्णलयात उपचारा दरम्यान निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते.
डॉ. बऱ्हाणपुरकर यांची विद्यार्थीप्रिय प्राध्यापक अशी त्यांची ख्याती होती. अंबाजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालयात त्यांचे पदवीपर्यंतचे झाले. विशेष म्हणजे प्रारंभी त्यांनी प्राणीशास्त्र या विषयात एम एस्सी व पीएचडी प्राप्त केली होती. नंतर त्यांनी अमेरिकेतील मँचेस्टर विद्यापीठात नाट्यशास्त्र या विषयात पीएचडी प्राप्त केली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागात १९८० ते ३१ डिसेंबर २०१६ या काळात प्राध्यापक म्हणून कार्य केले. मागील महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज पहाटे पावणे पाचच्या दरम्यान त्यांचे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात सुवर्णा पाटील या बहीण आहेत. हिंदी विभागाचे माजीप्रमुख डॉ माधव सोनटक्के यांचे ते मेहुणे होत.
आज सायंकाळी अंत्यसंस्कारदरम्यान, डॉ शशिकांत बऱ्हाणपुरकर यांचे पार्थिव आज दुपारी १२ वाजेपर्यंत औरंगाबादेत एमजीएम रुग्णालयात ठेवण्यात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यांच्यावर बीड जिल्ह्यातील मूळगावी बऱ्हाणपूर (ता. जि : बीड) आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती नाट्यशास्त्र विभाप्रमुख डॉ. जयंत शेवतेकर यांनी दिली आहे.