छत्रपती संभाजीनगर :महाराष्ट्रातील देश पातळीवर मान्यता प्राप्त नामवंत साहित्यिक, लेखक आणि संपादकांचे मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना ईमेल द्वारे मराठा आरक्षणावर तातडीने तोडगा काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, मराठा आरक्षणासाठी मा.मनोज जरांगे पाटील यांचे प्राणांतिक उपोषण सुरू आहे. त्यांनी केलेली मागणी मान्य करून हे उपोषण सोडवून कोट्यवधी मराठा समाज बांधवांचे अश्रू पुसावेत.
कुणबी आणि मराठा ही एकच जात आहेत. ओबीसीतून कुणब्यांना विदर्भात आरक्षण मिळाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील मराठ्यांचे रोटी-बेटी व्यवहार प्रचलीत आहेत. तात्पर्य कुणबी मराठा एकच जात असल्यामुळे त्या आरक्षणाचा लाभ समस्त मराठा जातीला मिळाला पाहिजे, ही जरांगे पाटलांची मागणी अगदी रास्त आहे. ती मागणी महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर मान्य करावी. कालहरण करू नये. याचे कारण जरांगे पाटलांची प्रकृती अतिशय खालावली आहे. आम्हाला त्यांची काळजी वाटते. म्हणून महाराष्ट्र सरकारने यांचा गांभिर्याने विचार करून त्यांची मागणी मान्य करावी.
आज अनेक मराठा तरूणांनी आत्महत्येचं शस्त्र हाती घेतले आहे. ही गोष्ट गंभीर आहे. ती अतिटोकाला जाण्याची सरकारनं वाट पाहू नये. वेळीच खबरदारी घ्यावी, असे आम्ही लेखक, कवी आणि साहित्यिक सरकारला एकमुखानं आवाहन करीत आहोत. सादर निवेदनावर डॉ.सदानंद मोरे (ज्येष्ठ विचारवंत, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई), प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील (अध्यक्ष, मराठवाडा साहित्य परिषद, छ.संभाजीनगर), प्रा.दत्ता भगत (ज्येष्ठ नाटककार, माजी अध्यक्ष अ.भा.नाट्यसंमेलन), डॉ.दादा गोरे (ज्येष्ठ लेखक तथा कार्यवाह मराठवाडा साहित्य परिषद, छ.संभाजीनगर), अनुराधा पाटील (जेष्ठ कवयित्री, साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या), प्रा.भगवंत क्षीरसागर (ज्येष्ठ कवी, अनुवादक), डॉ.जगदीश कदम (ज्येष्ठ लेखक तथा अध्यक्ष 43 वे मराठवाडा साहित्य संमेलन), श्रीकांत साहेबराव देशमुख (साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक), दत्ता डांगे (ज्येष्ठ प्रकाशक), दगडू लोमटे (ज्येष्ठ लेखक, समाजसेवक), निर्मलकुमार सूर्यवंशी (ज्येष्ठ प्रकाशक, नांदेड), प्राचार्य नागनाथ पाटील (ज्येष्ठ कथाकार), डॉ जयद्रथ जाधव (अध्यक्ष मराठवाडा साहित्य परिषद, लातूर), डॉ सुरेश सावंत(ज्येष्ठ कवी, लेखक), दिगंबर कदम(ज्येष्ठ कथाकार), प्रा.महेश मोरे (ज्येष्ठ कवी), प्रा.रामदास बोकारे (समीक्षक), शिवाजी कपाळे (लेखक, निवृत्त प्रशासकीय अधिकारी), उपप्राचार्य नारायण शिंदे (ज्येष्ठ कथाकार, अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण विचारमंच, नांदेड), डॉ.मा.मा.जाधव (संपादक,अध्यक्ष, मराठी अभ्यास मंडळ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड), डॉ.शारदा कदम (लेखिका), डॉ.कमलाकर चव्हाण (कवी, समीक्षक), मोतीराम राठोड (ज्येष्ठ लेखक), डॉ.माधव जाधव (कथाकार, राज्य पुरस्कार प्राप्त लेखक), श्रीनिवास मस्के (रान कवी), प्रा.रविचंद्र हडसनकर (ज्येष्ठ कवी), बाबु बिरादार (ज्येष्ठ कादंबरीकार, माजी अध्यक्ष, मराठवाडा साहित्य संमेलन), प्रा.नागोराव उतकर (कवी, समीक्षक), लक्ष्मण मलगीरवार (ज्येष्ठ कवी), संतोष तांबे (कवी, संपादक), डॉ.ललित अधाने (ज्येष्ठ कवी), भ.मा.परसवाळे (ज्येष्ठ कवी, चित्रकार), डॉ.गणेश मोहिते (समीक्षक), संदीप शिवाजीराव जगदाळे (कवी) आदींच्या नावांचा संदर्भ दिला आहे.