निवेदनात म्हटले की, केंद्र सरकारने मागील काळात बहुमताचा गैरवापर करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे काळे कृषी कायदे मंजूर करून घेतले आहेत. या कायद्यामुळे मूठभर उद्योगपतींचे भले होणार असून देशभरातील शेतकरी व त्यांचा शेती व्यवसाय उद्ध्वस्त होणार आहे. दिल्ली येथे देशभरातील शेतकरी सदरचा कायदा रद्द करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. दुर्दैवाने या शेतकऱ्यांच्या विषयी कुठलीही आस्था केंद्र शासनाला नाही. दिल्ली येथे होणाऱ्या आंदोलनाला काँग्रेसच्या वतीने पाठिंबा दिला जात असून केंद्र सरकारने शेतकऱ्यांप्रती संवेदना दाखविली पाहिजे.
याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर, नारायण चनघटे, नईम मन्सुरी, माजी नगराध्यक्ष, मोहसीन चाऊस, भारत तूपलोंढे, बद्रीनाथ बाराहाते, मकसूद शेख, नानासाहेब सोनवणे, अब्बास कुरेशी, नामदेव मनाळ, राजेंद्र दंडे, नीलेश पाटील, सागर दळवी, रमेश फोलाने, अभय भोसले, राहुल बानगुडे, सुभाष बनकर आदींसह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो : तहसील प्रशासनाला निवेदन देताना किरण पाटील डोणगावकर, नईम मंसुरी, बद्रीनाथ बाराहाते, नामदेव मनाळ.