हिंगोली : येथील तहसीलच्या अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रतिबंधक पथकाने पावत्यांची विचारणा करताच धक्का देवून पळ काढणाऱ्या दोन ट्रॅक्टरचालकांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अवैध वाळू वाहतुकीचे प्रमाण वाढल्याने महसूल विभागाने ते थांबविण्यासाठी पथके तयारी केली आहेत. परंतु या पथकातील कर्मचाऱ्यांना धमकावणे व वाहने अंगावर घालण्याचे प्रकार घडत आहेत. असाच एक प्रकार १९ मार्च रोजी सकाळी ५.४५ ला घडला. यात शेषराव कांबळे या कर्मचाऱ्याने ट्रॅक्टर चालक हुसेन रमजान प्यारेवाले व रमजान छोटू प्यारेवाले यांच्याकडे पावत्याची मागणी केली होती. परंतु त्या मिळून न आल्याने त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरु केली. परंतु चालकांने तोपर्यंत दहा ते बारा जण बोलावून गोंधळ घातला. कर्मचारी कांबळे यांना धक्का देत ट्रॅक्टरसह पलायन केले. हा प्रकार पथक प्रमुख नायब तहसीलदार सचीन जैस्वाल यांना सांगितला. त्यांनी घटनास्थळी पोलसांना पाठवून परिस्थतीची माहिती घेण्यास सांगितले. हुसेन रमजान प्यारेवाले व रमजान छोटू प्यारेवाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वाळूप्रकरणी पुन्हा वाद, गुन्हा
By admin | Published: March 20, 2016 11:19 PM