शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

लाचेच्या मागणीची बिनधास्त तक्रार करा, तुमचे कोणतेही काम अडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 6:24 PM

कोणतेही सरकारी काम करण्यासाठी मोबदला अथवा बक्षीस म्हणून मागितलेले पैसे, वस्तू अथवा शरीरसुखाची मागणीसुद्धा लाचेच्या व्याख्येत येते. एवढेच नव्हे तर   जवळच्या व्यक्तीच्या लाभाचे काम  देण्यास सांगणेही लाचच आहे. विविध कारवायांच्या पार्शभूमीवर पोलीस अधीक्षक चावरिया यांनी लोकमतशी बातचीत केली.

- बापू सोळुंके 

औरंगाबाद : सरकारी काम करण्यासाठी सरकारी अधिकारी, कर्मचारी असो वा लोकप्रतिनिधी लाचेची मागणी करीत असेल तर, त्यांच्याविरुद्ध बिनधास्त तक्रार करा, तुमचे कोणतेही काम अडणार नाही, अशी ग्वाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्याऔरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी लोकमतच्या माध्यमातून जनतेला दिली. एवढेच नव्हे तर तक्रार करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात येण्याची गरज नाही. केवळ एक फोन  करा अथवा मोबाईलवर अथवा व्हॉटस्अ‍ॅपवरून आम्हाला मेसेज पाठवा, आमचे अधिकारी तुमच्याकडे येतील आणि तक्रार लिहून घेतील. आवश्यक पडताळणी करून भ्रष्टाचाऱ्यांना रंगेहात पकडतील, असा ठाम विश्वास त्यांनी दिला.  

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या औरंगाबाद युनिटने ८ दिवसांत महसूल विभागाच्या वरिष्ठ सहायक सचिन पंडितला ४० हजारांची लाच घेताना तर एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक राहुल रोडे, सहायक उपनिरीक्षक शेख अन्वर यांना ८० हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडले. एवढेच नव्हे तर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याविरोधात लाच मागितल्याचा गुन्हा नोंदविला. या कारवायांच्या पार्श्वभूमीवर  पोलीस अधीक्षक चावरिया यांनी लोकमतशी बातचीत केली.

प्रश्न : लाच मागितल्याची तक्रार कोणाविरुद्ध करता येते? उत्तर : कोणतेही सरकारी काम करण्यासाठी पैसे मागणारा सरकारी अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि शासनाचे अनुदान घेणाऱ्या खाजगी शैक्षणिक संस्थेचा व्यक्ती अथवा शासनाचे अनुदान घेणाऱ्या स्वयंसेवी संस्थाचालकांविरुद्धही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करता येते. 

प्रश्न :  सापळा रचून लाचखोरांना पकडण्याची प्रक्रिया कशी होते?उत्तर : तक्रार प्राप्त झाल्यानंतर तक्रारदाराला संबंधित लोकसेवक अथवा लोकप्रतिनिधीने खरेच लाचेची मागणी केली आहे का, याबाबत दोन सरकारी पंच पाठवून पडताळणी केली जाते. तसे निष्पन्न झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा रचला जातो. तक्रारदारांना लाचेची रक्कम घेऊन आरोपींकडे पाठविले जाते. त्यांनी लाचेची रक्कम घेताच एसीबीचे अधिकारी त्यांना लाचेच्या रकमेसह रंगेहात पकडतात.

प्रश्न : तक्रारींची माहिती लाचखोरांपर्यंत लिक होण्याची शक्यता आहे का?उत्तर : नाही. गोपनीयता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा आत्मा आहे. तक्रारदार आल्यानंतर त्याला थेट आपल्याकडे घेऊन येण्याचे आदेश दिले  आहे. प्राप्त तक्रारीनंतर सापळा रचण्याची अंमलबजावणी परिक्षेत्रातील कोणत्या अधिकाऱ्यांवर सोपवावी, हे आपणच निश्चित करतो. एखाद्या वेळी आपण कार्यालयात नसेल तर तक्रारदारांशी कोणताही संवाद न साधता त्याला एका खोलीत बंद करून त्याच्या मोबाईलवर आपण स्वत: बोलून तक्रार ऐकून घेतो. हीच पद्धत जालना, बीड आणि उस्मानाबादेतील तक्रारदारांसाठी वापरली जाते. एवढेच नव्हे तर एसीबीच्या पोलीस शिपायांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचे मोबाईल ते कार्यालयात आल्यापासून रात्री घरी जाईपर्यंत जमा करून घेतले जातात. 

प्रश्न : अन्य जिल्ह्यातील कामकाजावर कसे नियंत्रण ठेवता?उत्तर : औरंगाबादसह जालना, बीड आणि उस्मानाबादेतील एसीबीची कार्यालये आॅनलाईन सीसीटीव्हीने जोडलेली आहेत. सीसीटीव्हीचा डाटा एक महिन्यापर्यंत साठवून ठेवला जातो. अधीक्षक कार्यालयातील संगणकावर , आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरसुद्धा कोणत्याही कार्यालयाचे कामकाज आॅनलाईन पाहत असतो.

बेहिशेबी मालमत्ता  बाळगणाऱ्याविरूद्धएसीबीकडून कधी कारवाई होते का?भ्रष्ट मार्गाने आणि पदाचा दुरुपयोग करून सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी घबाड जमा करतात. तक्रार आल्यानंतर खुली चौकशी केली जाते. या चौकशीत बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचे  निष्पन्न झाल्यानंतर  गुन्हा नोंदवून अटक केली जाते. एवढेच नव्हे तर लाच घेताना पकडल्यानंतर संबंधित लाचखोरांविरोधात उघड चौकशी केली जाते. या चौकशीत त्यांनी बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचे समोर आल्यानंतर एसीबीकडून दुसरा गुन्हा नोंदविला जातो. त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याची शिफारस एसीबीकडून केली जाते.

एसीबीकडे जास्त तक्रारदार यावे, याकरिता  जनजागृती सप्ताह राबविला.  टोल फ्री आणि व्हॉटस्अ‍ॅप क्रमांकही उपलब्ध केला .  - अरविंद चावरिया

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिस