नांदेड : वृत्तपत्र विके्रत्यांची असंघटित कामगार म्हणून नोंद करून त्यांच्यासाठी वृत्तपत्र विके्रता कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाच्या वतीने जिल्हा कामगार अधिकारी अविनाश पेरके यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली़वृत्तपत्र विके्रता हा असंघटित कामगार असून त्यांची असंघटित कामगार म्हणून नोंद करावी, जेणेकरून असंघटित क्षेत्रातील घटकांना प्राप्त होणाऱ्या शासनाच्या सवलती मिळतील, असे निवेदनात म्हटले आहे़ शिष्टमंडळाने कामगार अधिकारी पेरके यांची भेट घेवून आपल्या मागण्या मांडल्या़ पेरके यांनी निवेदनावर सकारात्मक चर्चा करून वृत्तपत्र विके्रत्यांच्या अडचणी जाणून घेतल्या़ तसेच सदरील निवेदन राज्याचे कामगार आयुक्त यांच्याकडे पाठवून देवू, असे आश्वासन दिले़ दरम्यान, राज्य संघटनेचे सरचिटणीस व जिल्हाध्यक्ष बालाजी पवार म्हणाले, राज्यातील सर्व जिल्हा कामगार अधिकाऱ्यांना निवेदन देत आहोत़ वृत्तपत्र विके्रत्यांना कामाबद्दल योग्य तो मोबदला मिळावा व त्यांना असंघटित क्षेत्रातील घटकांना मिळणाऱ्या शासन सुविधा मिळाव्यात याकरिता आमचा पाठपुरावा सुरू आहे, असे पवार यांनी सांगितले़शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष बालाजी पवार, उपाध्यक्ष गणेश वडगावकर, सचिव चेतन चौधरी, सहसचिव अवधुत सावळे, कोषाध्यक्ष गरसप्पा जल्देवार, सल्लागार लक्ष्मीकांत पवार आदी वृत्तपत्र विके्रते उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
वृत्तपत्र विके्रत्यांची असंघटित कामगार म्हणून नोंद करा
By admin | Published: March 13, 2016 2:34 PM