औरंगाबाद : वाहन चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. वाहन चोरीच्या तक्रारी नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात जाण्याची आता गरज राहिली नाही. वाहन चोरीची तक्रार नोंदविण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी आता स्वतंत्र पोर्टल कार्यान्वित केले आहे. या पोर्टलवर वाहन चोरीची तक्रार घरबसल्या अँड्रॉईड मोबाईल, संगणक अथवा इंटरनेट कॅफेच्या माध्यमातून नोंदविता येणार आहे. याविषयी सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी सांगितले की, वाहनमालकाने प्रथम महाराष्ट्र पोलीस विभागाच्या या आॅनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. ६६६.५ंँंल्लूँङ्म१्र३ं‘ं१ं१.ूङ्मे या संकेतस्थळावर स्वत:चा मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, स्वत:चे नाव, पासवर्ड नोंद करावा. त्यानंतर तुम्हाला दुसरा ओटीपी नंबर देण्यात येतो. या ओटीपी क्रमांकाचा वापर करून नोंदणी करावी लागेल.नोंदणीनंतर वाहन हरवले किंवा चोरीला गेले तर याबाबतची तक्रार तुम्ही या पोर्टलवर करता येणार आहे.ही तक्रार करताना वाहनाचा प्रकार, वाहन कोणत्या कंपनीचे आहे. आरटीओ नोंदणी क्रमांक, चेसीस नंबर, इंजिन नंबर, वाहनाचा रंग, वाहनमालकाचे नाव, कोठून चोरीला गेले आदी माहिती भरावी लागते. त्यानंतर ही तक्रार संबंधित पोलीस ठाण्याला आॅनलाईन पाठविली जाते. या पोर्टलवर कोणाला त्रास देण्याच्या हेतूने तक्रार दाखल केल्यास तक्रारदारावरच कार्यवाही होऊ शकते.