औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आगामी महिन्यात ‘नॅक’ला सामोरे जात आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील विविध तज्ज्ञांकडून विद्यापीठाचे गुणवत्ता परीक्षण करण्यात येत आहे. दुसऱ्या दिवशी समितींनी विविध विभागांना भेटी दिल्या. या सर्व पाहणीचा अहवाल शनिवारी (दि.१५) देण्यात येणार आहे.
हैदराबाद येथील मौलाना आझाद नॅशनल उर्दू विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. महंमद मियान यांच्या अध्यक्षतेखाली देशातील दहा प्राध्यापकांचे पथक दोन दिवसांपासून विद्यापीठातील विविध विभागांच्या गुणत्तेचे परीक्षण करीत आहे. १० प्राध्यापकांच्या चार पथकांनी शुक्रवारी विविध विभागांना भेटी दिल्या. यात व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांसोबतही या समितीने चर्चा केली.
या सर्व पाहणीचा अहवाल शनिवारी विद्यापीठाकडे सुपूर्द केला जाणार आहे. यात कमतरता आणि चांगल्या बाजू असतील, अशी माहिती प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी दिली.